Rishabh Pant : रिषभ पंत आयपीएलसाठी तयार

रिषभ पंत अलीकडेच अलूर इथं एक सराव सामना खेळला आहे. 

88
Rishabh Pant : रिषभ पंत आयपीएलसाठी तयार
  • ऋजुता लुकतुके

दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं बुधवारी स्पष्ट झालं आहे. अलूर इथं एका सराव सामन्यात तो सहभागी झाला होता. २०२२ मध्ये झालेल्या गंभीर रस्ते अपघातानंतर रिषभ बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत उपचार घेत होता. आणि या अपघातानंतर त्याने खेळलेला हा पहिला सामना होता. (Rishabh Pant)

बीसीसीआयचंही (BCCI) रिषभच्या तंदुरुस्तीवर लक्ष आहे. आणि आगामी आयपीएलमध्ये रिषभ फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. आणि तो यष्टीरक्षण करणार नाही, असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी मीडियाला सांगितलं आहे. या सूत्रांनी अशीही माहिती दिली आहे की, रिषभ पंतची फलंदाजी आणि धावण्याची क्रिया ही अपघाताच्या पूर्वी होती तितकीच सक्षम आहे. रिषभ पंत १५ महिने क्रिकेटपासून दूर आहे. (Rishabh Pant)

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : इंग्लिश कर्णधार उर्वरित कसोटींत गोलंदाजी करण्याची शक्यता)

रिषभ इतके सामने खेळला आहे

रिषभवरील (Rishabh Pant) उपचार आणि नंतरचं पुनर्वसन यावर बीसीसीआय (BCCI) आणि त्याची दिल्ली कॅपिटल्स ही फ्रँचाईजी असे दोघंही लक्ष ठेवून होते. दिल्ली कॅपिटल्सचे सल्लागार सौरव गांगुली यांनी पहिल्यांदा नोव्हेंबर २०२३ मध्येच रिषभ आयपीएल (IPL) खेळण्याच्या पूर्ण तयारीत आहे, असं म्हटलं होतं. आणि आता संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगही रिषभच्या तंदुरुस्तीवर वेळोवेळी अपडेट देत आहेत. अलीकडेच पाँटिंग यांनी रिषभ आयपीएल (IPL) खेळायला तयार आहे. आणि अगदी चौथ्या क्रमांकावर तो फलंदाजीही करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. (Rishabh Pant)

यंदाची आयपीएल स्पर्धा २२ मार्चपासून भारतातच होणार असल्याचं स्पर्धेचे संचालक अरुण धुमाळ यांनी अलीकडेच म्हटलं होतं. पण, नेमकं वेळापत्रक सार्वत्रिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झाल्यावरच तयार होणार आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) २०१६ मध्ये पहिल्यांदा आयपीएल (IPL) स्पर्धेत खेळला. आणि त्यानंतर ७ हंगामात मिळून त्याने २,८३८ धावा केल्या आहेत. तर भारताकडूनही रिषभ ३३ कसोटी, ३० एकदिवसीय सामने आणि ६६ टी-२० सामने खेळला आहे. तो खेळत असताना संघ प्रशासनाचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिल्या पसंतीचा खेळाडू होता. (Rishabh Pant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.