पुढील ५ वर्षात आणखी ३ कोटी नवीन घरे बांधली जातील, PM Narendra Modi यांचे आश्वासन

ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक आहे. असंही म्हणाले.

189
पुढील ५ वर्षात आणखी ३ कोटी नवीन घरे बांधली जातील, PM Narendra Modi यांचे आश्वासन

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election 2024) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी (Aasam Nalbari) येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, आजचा दिवस रामनवमीचा (Ramnavmi) आहे आणि हे ऐतिहासिक पर्व आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. एनडीएने देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ५ वर्षात आणखी ३ कोटी नवीन घरे बांधली जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी सभेतील जनतेला दिले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबईत उद्धव ठाकरेंना बसणार फटका; महायुतीला किती जागा मिळणार? जाणून घ्या ओपनियन पोल… ) 

ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक

या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील गया येथे निवडणूक रॅलीला (Bihar Election Rally) संबोधित केले होते. यावेळी ते म्हणाले होते की, ही ती भूमी आहे जिने मगधचे ऐश्वर्य पाहिले आहे, बिहारचे वैभव पाहिले आहे. योगायोगाने मी गयाला आलो तेव्हा नवरात्री आहे आणि सम्राट अशोकाची जयंतीही आहे. शतकांनंतर, पुन्हा एकदा भारत आणि बिहार त्यांचे प्राचीन वैभव परत करण्यासाठी पुढे जात आहेत. याशिवाय ही निवडणूक म्हणजे विकसित भारत आणि विकसित बिहार या एकाच संकल्पाची निवडणूक आहे. गयाच्या भूमीवर जमलेली ही गर्दी, हा प्रचंड जनसमर्थन स्पष्टपणे सांगत आहे – पुन्हा एकदा मोदी सरकार. अवघ्या २ दिवसांपूर्वी भाजपने आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार )

आसाममध्ये कधी होणार निवडणूक ?
देशभरात लोकसभेच्या एकूण ५४३ (Lok Sabha election 543 seat) जागांसाठी  ०७ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. देशात पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे, तर शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. ४ जून रोजी देशभरातील निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. आसाम राज्याबद्दल बोलायचे झाले, तर १४ जागांवर ३ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि ०७ मे रोजी मतदान होणार आहे. (PM Narendra Modi)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.