शिवाजी पार्कमध्ये होणार सभा… Raj Thackeray आणि पंतप्रधान Narendra Modi एकाच मंचावर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाढव्याच्या दिवशी भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र आता आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे.

173
शिवाजी पार्कमध्ये होणार सभा... Raj Thackeray आणि पंतप्रधान Narendra Modi एकाच मंचावर 

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकाच मंचावर दिसतील. लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरती होईल अशी माहिती अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाढव्याच्या दिवशी भाजपासह महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election2024) नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन ही राज ठाकरे यांनी जनतेला केले. महायुतीला पाठिंबा दर्शवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले. (Raj Thackeray Narendra Modi)

(हेही वाचा – Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब, दैनंदिन गरजांसाठीही लोकांचा संघर्ष)

दरम्यान, अमित ठाकरे (Amit Thackeray) पुणे दौऱ्यावर असून, सध्या ते प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. तसेच अमित ठाकरे यांच्या कडून महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना ही करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेनेच्यावतीने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे जे मनसे पदाधिकारी पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. अशा पद्धतीचा आदेश सुद्धा आता मनसेकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीसाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मनसे दणका देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Raj Thackeray Narendra Modi)     

(हेही वाचा – Gold Rate : सोन्याचे दर खरंच १ लाखांपर्यंत जातील का?

राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यावेळी (Gudhi Padhwa melawa) कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना अशी माहिती दिली.  (Raj Thackeray Narendra Modi)     

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.