India’s T20 World Cup Squad : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, चहल, पंत आणि सॅमसन यांची संघात वर्णी

India’s T20 World Cup Squad : रोहित कर्णधार असलेल्या या संघात हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. 

127
India’s T20 World Cup Squad : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, चहल, पंत आणि सॅमसन यांची संघात वर्णी
  • ऋजुता लुकतुके

आगामी टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. आणि यात अजित आगरकरांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयपीएलमधील कामगिरीवर पूर्ण भर न देता मागील वर्षभरातील खेळाडूंची कामगिरी गृहित धरलेली दिसतेय. पण, त्याचबरोबर यजुवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना आयपीएलमधील कामगिरीचा फायदा झालेलाही दिसतोय. (India’s T20 World Cup Squad)

पंधरा जणांच्या या संघाचा कर्णधार अर्थातच रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे आणि उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्ट्राईकरेटवर आयपीएल दरम्यान कितीही चर्चा झाली असली तरी संघातील आघाडीच्या फळीत त्याची वर्णी लागली आहे. फलंदाजीची धुरा रोहित, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. तर संघात तीन फिरकीपटू आहेत कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल. तेज गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज सह अर्शदीप सिंग आणि आवेश सिंगवर असेल. (India’s T20 World Cup Squad)

(हेही वाचा – Chhattisgarh: नारायणपूरच्या अबुझमद भागात ७ नक्षलवादी ठार, शस्रे आणि स्फोटके जप्त)

रिषभ पंतने दीड वर्षांनंतर भारतीय संघात (Indian team) पुनरागमन केलं आहे. डेहराडूनमध्ये रस्ते अपघातात दुखापतग्रस्त झालेल्या पंतने अथक मेहनत घेऊन तंदुरुस्ती कमावली आहे. आणि आयपीएलमध्ये (IPL) तंदुरुस्ती आणि फॉर्म दाखवून देत त्याने संघात जागाही पटकावली. अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा संघात आहेत. १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० (T20) स्पर्धेला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघ पुढील प्रमाणे, (India’s T20 World Cup Squad)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज (India’s T20 World Cup Squad)

राखीव खेळाडू – शुभमन गिल, आवेश खान, खलील अहमद व रिंकू सिंग (India’s T20 World Cup Squad)

भारताची विश्वचषकातील साखळी सामने,
  • ५ जून २०२४ – वि. आर्यलंड (न्यूयॉर्क)
  • ९ जून २०२४ – वि. पाकिस्तान (न्यूयॉर्क)
  • १२ जून २०१४ – वि. युएसए (न्यूयॉर्क)
  • १५ जून २०२४ – वि. कॅनडा (न्यूयॉर्क) (India’s T20 World Cup Squad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.