जम्मू-काश्मीरमध्ये 25 लाख नवे मतदार, काय आहे कारण?

112

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील राजकारणात मोठे फेरफार झाले आहेत. हे कलम हटवल्यानंतर आता पहिल्यांदाच काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबवर मध्ये जम्मू-काश्मीमध्ये सार्वत्रिक निवडणुका लागू शकतात. पण ही कलमे हटवण्यात आल्यामुळे यावेळी पहिल्यांदाच गैरकाश्मिरींना जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे.

यामुळे तब्बल 20 ते 25 लाख नव्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. यामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

33 टक्के मतदार वाढणार

जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी,व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी वास्तव्य करणा-या नागरिकांना कलम 35ए मुळे मतदानाचा हक्क प्राप्त होत नव्हता. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यावर देखील बंधने घालण्यात आली होती. पण आता ही वादग्रस्त कलमे हटवण्यात आल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक नसलेल्या पण वास्तव्य करणा-या नागरिकांनाही विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे.

(हेही वाचाः MPSC Exam 2022: सरकारी पदभरती मध्ये मोठी वाढ, 340 नव्या जागांसाठी होणार भरती)

यामुळे जम्मू-काश्मीरमधील मतदारांची संख्या थेट 33 टक्क्यांनी वाढणार असून 20 ते 25 लाख नवे मतदार समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे याचा फायदा केंद्रातील भाजपला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मतदारसंघांची पुनर्रचना

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या स्थापनेनंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा सदस्यांची संख्या ही 90 झाली आहे. यामध्ये पहिल्यांदाच अनुसूचित जमातींसाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जातींसाठी 7 जागा राखीव आहेत. या नव्या जागांसाठी आता मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येत आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.