Colestrol : शरीरातील नको असलेला कोलेस्ट्रॉल ‘या’ पदार्थाने होईल कायमचा दूर

244

जेवणात वापरला जाणारा, स्वयंपाकघरामध्ये हमखास दिसणारा लसूण हा नुसता पदार्थांची फक्त चवच वाढवत नाही तर लसणीला आयुर्वेदातही महत्वाचे स्थान आहे. परंतू, लसूण शरीरातील नको असलेले कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मदत करते. लसणीच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते. अशातच, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचे सेवन कशाप्रकारे करावे याचे उपाय घेऊन आलो आहोत, या उपायांनी तुम्ही मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकता, चला जाणून घेऊयात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचे सेवन कसे करावे.

नको असलेला कोलेस्ट्रॉल कमी करेल लसूण

१. लसणीचे पाणी

यासाठी कच्च्या लसणाची १ पाकळी ठेचून रोज सकाळी १ ग्लास पाण्यासोबत सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरात नको असलेला कोलेस्ट्रॉल सहज बाहेर पडू लागते.

२. मध आणि लसूण

यासाठी १ लसणाचे पाकळीचे ४-५ तुकडे करा. मग या तुकड्यांमध्ये थोडे मध मिसळा. मग हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी खा. अॅसिडिटीच्या समस्येसोबतच वजन कमी करण्यासही मदत होईल.

३. लसूण तेल

रोजच्या स्वयंपाकात जर तुम्ही लसणाचे तेल वापरुन भाज्या, पराठे किंवा सॅलड बनवून खाल्ल्यास वजन कमी करण्यास तसेच शरीरातील नको असलेले कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, लसणीच्या तेलाचे जास्त सेवन केल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

(हेही वाचा झारखंड : ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेत टिकली लावली म्हणून विद्यार्थीनीला मारहाण; मुलीची आत्महत्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.