बाप्पा घेताहेत आकार; गणेशमूर्ती कारखान्यांत लगबग वाढली

119
बाप्पा घेताहेत आकार; गणेशमूर्ती कारखान्यांत लगबग वाढली
बाप्पा घेताहेत आकार; गणेशमूर्ती कारखान्यांत लगबग वाढली

गणेश उत्सवाकरिता आता केवळ तीन महिने शिल्लक राहिले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. अमरावती शहरात सुध्दा गणेशोत्सवात युवक मोठ्या प्रमाणात भाग घेतात. शहरातील विविध भागातील कारखान्यांमध्ये मूर्तिकार सत्तर हजारांच्या आसपास मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. गणेशभक्तांना पर्यावरण पूरक मूर्ती उपलब्ध करुन देण्याचा मूर्तिकारांचा प्रयत्न आहे.

गणेश उत्सव प्रारंभ होण्याकरिता काही महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. तसेच मूर्तीचे निर्माण वेळेच्या आधी व्हावे, हे मूर्तीकारांसमोर आव्हान आहे. वेळेच्या आधी काम पूर्ण व्हावे म्हणून मूर्तिकारांच्या घरातील सर्व सदस्य कामात व्यस्त आहेत. यावर्षी शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्त्यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे; मात्र मातीपासून बनविलेल्या मूर्त्या या पीओपी मूर्तीच्या तुलनेत थोड्या महाग असतात; परंतु मातीच्या मूर्तींना विशेष महत्त्व आहे. मातीच्या किंमती वाढल्याने मूर्त्यांच्या सुध्दा किंमती वाढण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षांपासून अमरावती महानगरपालिका पर्यावरण विभाग व शाडू माती गणेशमूर्तिकार संघ यांच्या पुढाकाराने शहरातील नागरिकांकरिता मूर्त्यांचे निर्माण केले जात आहे. आठ हजार मूर्त्यांपासून झालेली सुरुवात आता ६२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होऊन मूर्तिकार गणेश भक्तांकरिता मूर्त्या तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. गणेश उत्सवाकरिता काही महिने शिल्लक राहिले आहेत. चार फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्त्यांकरिता शाडू मातीचा उपयोग करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, अशी माहिती मूर्तिकार संघटनेने दिली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : सावरकर माझ्या जीवनात आल्याने जगणेच बदलले – रणदीप हुड्डा)

पर्यावरणाचे होत असलेले नुकसान पाहता पीओपीने बनविलेल्या मूर्त्यांऐवजी शाडूच्या मूर्त्यांवर तसेच शाडूच्या मूर्त्यां बनवणाऱ्या परिवारावरही महागाईचे सावट पडत आहे. मातीपासून तर कलरपर्यंत सर्वच वस्तुंचे भाव वाढल्याने मूर्तिच्या किंमतीमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त बांबू, सुतळी, खिळे, लाकूड या वस्तूंचीही भाव वाढ झाल्याने मूर्त्यांच्या किंमतीसुध्दा वाढण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.