दुर्ग बांधणीचा पारंपरिक वारसा

80

चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठान भुखंड क्र ८२९ च्यावतीने अनेक समाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ल्याची प्रतिकृती बनवली जाते, तसेच मुंबईमध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला जातो. या किल्ल्यांची प्रतिकृती बघायला अनेक मान्यवरांची उपस्थिती असते.

विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती

साहेब प्रतिष्ठान, गोराई यांच्यावतीने दरवर्षी दुर्ग बांधणी स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठानाने प्रथम वर्षी बनवलेल्या मल्हारगडाच्या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ तर दुसऱ्या वर्षी बनवलेल्या विजयदुर्ग आणि तिसऱ्या वर्षी बनवलेल्या जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते, चौथ्या वर्षी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती, तेव्हा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. गेल्या वर्षी म्हणजेच ५ व्या वर्षी मुंबई जवळ असलेल्या किल्ले वसईची प्रतिकृती बनवण्यात आली होती. यंदाच्या वर्षी याठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला बनवण्यात आला आहे.

(हेही वाचा – चारकोप ७ मधील पाणी समस्या सुटणार)

पारंपरिक वारसा जपण्याचा हेतू

दरवर्षी विविध किल्ले बनवून चारकोप ओम साई दर्शन प्रतिष्ठान महाराष्ट्रातील किल्ल्यांचे दर्शन घडवून पारंपरिक वारसा जपत आहेत. या प्रतिष्ठानचे सचिव संदीप जोशी यांनी मित्र-मंडळी आणि कुटुंबासह हा नळदुर्ग किल्ला आवर्जुन बघण्यास यावे असे, आवाहन जनतेला केले आहे. किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यापूर्वी दरवर्षी त्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिली जाते, तेथील जाणकारांकडून किल्ल्याची अधिकाधिक माहिती घेऊन त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून त्या सर्वांचा अभ्यास करून मगच प्रतिकृती बनवली जाते. प्रतिकृती बनवण्यासाठी सर्व लहान-थोर मंडळी, महिला ह्यांचा सुद्धा खुप मोठा सहभाग असतो, असेही त्यांनी स्पष्ट केेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.