Jamun Honey: जांभूळ मध हा प्रामुख्याने जांभळाच्या फुलांच्या मकरंदापासून तयार केलेला नैसर्गिक मध आहे. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या, (NCL) संशोधनानुसार, यात ग्लुकोजचे प्रमाण खूप कमी आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण तब्बल ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असते
एनसीएलची आरोग्यदायी गुणधर्मावर मोहोर
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (NCL) केलेल्या संशोधनानुसार, उपचारांमधील जांभूळ मध आरोग्यासाठी एक वैज्ञानिक वरदान ठरले आहे.
८५टक्क्यांपेक्षा जास्त अँण्टी ऑक्सिडंट्स
वैज्ञानिक चाचण्यांमध्ये या मधाची शरीरातील घातक घटकांशी लढण्याची अँण्टी-ऑक्सिडंट क्षमता तब्बल ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित
या मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही. परिणामी हा मध मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक
संशोधनादरम्यान जांभूळ मधामध्ये मानवी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वेगाने वाढवणारे १२ विशेष नैसर्गिक घटक सापडले आहेत.
कमी आंबटपणामुळे दीर्घकाळ टिकणार
जांभूळ मधाचे नैसर्गिकरित्या आंबण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे हे मध खराब न होता. दीर्घकाळ टिकून राहते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

