Pandharpur: विठ्ठल मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; २३-२४ जूनला प्रक्रिया होणार

60
Pandharpur: विठ्ठल मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; २३-२४ जूनला प्रक्रिया होणार
Pandharpur: विठ्ठल मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; २३-२४ जूनला प्रक्रिया होणार

Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी याचिका येथील भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी येथील जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुनावणी होऊन भीमाचार्य वरखेडकर यांचा न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळला आहे. दरम्यान मंदिर महासंघाचे गणेश लंके यांच्या अर्जावर उद्या (२२) न्यायालयात निर्णय होणार आहे,अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज झाली असून मुर्तीचे जतन आणि संवर्धन करण्याचा सल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाने मंदिर समितीला दिली आहे. त्यानुसार येत्या २२ ते २४ जून दरम्यान मुर्तीवर पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीवर लेपन प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २२ व २३ जून असे दोन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – CM Devendra Fadnavis : योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा

विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया न करता आयुर्वेदिक व्रजलेप करावा अशी मागणी राष्ट्रीय मंदिर महासंघा बरोबरच काही महाराज मंडळींनी केली आहे. मूर्तीवर करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी श्री.वरखेडकर यांनी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.तथापी न्यामूर्ती मेटकरी व न्यायमूर्ती सल्लागर यांनी त्यांचे दोन्ही अर्ज फेटाळले आहेत. तर राष्ट्रीय मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनीही रासायनिक प्रक्रिया न करता व्रजलेप करावा यासाठी जिल्हा न्यायालयात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर शनिवारी ( २० जून) सुनावणी झाली.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार…

सोमवारी (२२ जून) अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. सध्यातरी न्यायालयाने मुर्तीवर करण्यात येणार्या लेपन प्रक्रियेला कोणती ही स्थगिती अथवा मनाई आदेश दिलेला नाही. त्यामुळे मंदिर समितीने ठरवलेल्या वेळेनुसार मुर्तीवर लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. लेपन प्रक्रिया ही भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार होणार आहे. तसेच मंदिर समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार सेंद्रिय पद्धतीचादेखील यामध्ये वापर करण्यात येणार असल्याचेही शेळके यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.