Tamil Nadu Ammonia Gas Leak : तामिळनाडूत सीफूड कारखान्यात अमोनिया वायूची गळती; ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ जण रुग्णालयात

53
Tamil Nadu Ammonia Gas Leak : तामिळनाडूत सीफूड कारखान्यात अमोनिया वायूची गळती; ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ जण रुग्णालयात
Tamil Nadu Ammonia Gas Leak : तामिळनाडूत सीफूड कारखान्यात अमोनिया वायूची गळती; ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ जण रुग्णालयात

Tamil Nadu Ammonia Gas Leak : तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात एका मत्स्य प्रक्रिया केंद्रात (फूड प्रोसेसिंग युनिट) अमोनिया वायूची भीषण गळती (Ammonia Gas Leak) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अत्यंत वेदनादायक अपघातात ७ महिला कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला असून, किमान ६७ कामगारांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. (Tamil Nadu Ammonia Gas Leak)

मुख्य व्हॉल्व्हमधून गॅस गळती

ही दुर्घटना पेरियापालयम जवळील कन्निगापैर गावात असलेल्या ‘सेंट पीटर्स अँड पॉल सीफूड्स एक्स्पोर्ट्स’ या कारखान्यात घडली. प्राथमिक तपासानुसार, कारखान्यात बसवलेल्या एका मुख्य व्हॉल्व्हमधून अचानक अमोनिया गॅसची गळती सुरू झाली. वायूच्या संपर्कात येताच कामगारांना श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला. कारखाना परिसरात एकच खळबळ उडाल्यानंतर बाधित कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले. (Tamil Nadu Ammonia Gas Leak)

उत्तर भारतातील स्थलांतरित मजूर बाधित: या अपघाताचा बळी ठरलेले आणि बाधित झालेले बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील विविध राज्यांमधून तामिळनाडूत (Tamil Nadu) आलेले स्थलांतरित मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा – Pandharpur: विठ्ठल मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; २३-२४ जूनला प्रक्रिया होणार)

कंपनीच्या मालकाला अटक; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या घटनेची गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकारने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. गॅस गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी डीन डॉ. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कंपनीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला असून, कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच इतर काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तिरुवल्लूर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री कुमार यांनी तातडीने रुग्णालयांना भेट देऊन जखमींच्या उपचारांची पाहणी केली. (Tamil Nadu Ammonia Gas Leak)

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त

तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. “कन्निगापैर गावाजवळील कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे निष्पाप लोकांचा जीव जाणे अत्यंत क्लेशदायक आहे. अनेक कामगार जखमी झाल्याची बातमी चिंताजनक आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करतो,” असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. (Tamil Nadu Ammonia Gas Leak)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.