Sportif and Tennis-Core 2.0 : जिमपासून स्ट्रीटपर्यंत chic स्टाइल

77
Sportif and Tennis-Core 2.0 trendy athletic wear
Sportif and Tennis-Core 2.0 : जिमपासून स्ट्रीटपर्यंत chic स्टाइल

Sportif and Tennis-Core 2.0                  हल्लीच्या आधुनिक फॅशनच्या जगतामध्ये “स्पोर्टिफ” आणि “टेनिस-कोर २.०” हे दोन ट्रेंड्स वाऱ्याच्या गतीने लोकप्रिय होत आहेत. हे ट्रेंड्स फक्त फिटनेसपुरते मर्यादित नाहीत. तर ते दैनंदिन जीवनातही सहज वापरता येतात. कम्फर्टनेस आणि स्टाइल यांचा अतिशय सुंदर समतोल साधणारे हे ट्रेंड्स प्रत्येक वयोगटातल्या लोकांना आकर्षित करत आहेत. (Sportif and Tennis-Core 2.0)

स्पोर्टिफ स्टाइलचा बेस ऍथलेटिक वेअरमध्ये आहे. ट्रॅक पॅन्ट्स, जॉगर्स, हूडीज, स्पोर्ट्स ब्रा, लेगिंग्स आणि स्नीकर्स हे या स्पोर्टिफ स्टाइलचे मुख्य घटक आहेत. या कपड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते हलके, स्ट्रेचेबल आणि शरीराची मोकळेपणाने हालचाल होण्यासाठी कम्फर्टेबल असतात. (Sportif and Tennis-Core 2.0)

(हेही वाचा – फॅशन आणि टेकचा सुंदर मिलाफ; AI च्या आधारे अशाप्रकारे बनवा स्वतःसाठी आरामदायक कपडे!)

पण सध्याच्या ट्रेंडनुसार हे कपडे फक्त जिमपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जसं की, जॉगर्ससोबत फिटेड टॉप आणि त्यावर ओव्हरसाईज जॅकेट घातलं तर तो लुक स्ट्रीट स्टाइलसाठी परफेक्ट असतो. टेनिस-कोर २.० हा ट्रेंड पारंपरिक टेनिस फॅशनपासून प्रेरित झालेला आहे. पण त्यात थोडासा आधुनिक टच दिलेला आहे. प्लीटेड स्कर्ट्स, पोलो टी-शर्ट्स, व्हाइट स्नीकर्स आणि सॉफ्ट कलर्स हे या स्टाईलचं मुख्य वैशिष्ट्य आहे. या नव्या स्टाइलमध्ये पेस्टल शेड्स, मिनिमल प्रिंट्स आणि कधीकधी निऑन ऍक्सेंट्स वापरले जातात. या स्टाइलमुळे तुमचा लुक साधा, क्लासी आणि एलिगंट दिसतो, त्यामुळे तो कॅज्युअल आउटिंगसाठीही योग्य असतो. (Sportif and Tennis-Core 2.0)

या दोन्ही ट्रेंड्सची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे केलेला वापर होय. सकाळी वर्कआउटसाठी घातलेले कपडे थोड्याश्या स्टायलिंगचा बदल करून तुम्ही दिवसभरासाठीही वापरू शकता. जसं की, लेगिंग्सवर एक लाँग शर्ट किंवा क्रॉप टॉपवर ब्लेझर घातलं तर तुम्ही सहजच कॅफे, मॉल किंवा मित्रांना भेटण्यासाठी तयार होऊ शकता. (Sportif and Tennis-Core 2.0)

(हेही वाचा – वडाळा प्रकरणाचा फटका! BJP नेत्यांनी महापौरांसह नगरसेवकांची घेतली ‘शाळा’)

तुमच्या ऍक्सेसरीज सुद्धा या स्टाइलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कॅप्स, स्पोर्ट्स वॉच, मिनिमल ज्वेलरी आणि स्टायलिश बॅग्स लुक तुम्ही जास्त आकर्षक दिसू शकता. तसंच योग्य रंगसंगतीची निवड केली तर तुमचा लुक आणखी उठून दिसतो. (Sportif and Tennis-Core 2.0)

एकूणच काय तर, स्पोर्टिफ आणि टेनिस-कोर २.० हे ट्रेंड्स सध्याच्या जलदगतीने धावणाऱ्या जीवनशैलीसाठी अतिशय योग्य आहेत. या स्टाइलमुळे तुम्हाला कम्फर्ट, कॉन्फिडन्स आणि अट्रॅक्टिव्ह लुक एकाच वेळेस मिळतो. म्हणूनच जिमपासून स्ट्रीटपर्यंत स्टायलिश दिसण्यासाठी हे ट्रेंड्स नक्कीच तुम्ही वापरून पाहण्यासारखे आहेत. (Sportif and Tennis-Core 2.0)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.