Ladki Bahin Yojana : अखेर मुहूर्त ठरला! लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार ३००० रुपये

Ladki Bahin Yojana : अखेर मुहूर्त ठरला! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला जमा होणार ३००० रुपये

227
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; ई-केवायसीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची घोषणा
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; ई-केवायसीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची घोषणा
प्रतिनिधी

​राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्याबाबत आता अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला ‘लाडकी बहीण’ योजनेचा(Ladki Bahin Yojana)हप्ता आता थेट दुप्पट होऊन महिलांच्या पदरात पडणार आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे पैसे अद्याप जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केले आहे की, दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जातील.(Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – फॅशन आणि टेकचा सुंदर मिलाफ; AI च्या आधारे अशाप्रकारे बनवा स्वतःसाठी आरामदायक कपडे! )

​आर्थिक वर्षाची सांगता आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे या निधी वितरणास विलंब झाला होता. मात्र, आता हा अडथळा दूर झाला असून सरकारने १५ मे पर्यंत ही रक्कम जमा करण्याचे नियोजन केले आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून हे दोन हप्ते एकत्रितपणे पाठवले जाणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रलंबित हप्त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.(Ladki Bahin Yojana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.