
Martyrdom of Guru Arjan Dev Sahib शीख धर्माचे पाचवे गुरू अर्जन देव यांचा हुतात्मा दिन दरवर्षी मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. १६ जून १६०६ मध्ये त्यांना तत्कालीन मुघल सत्तेकडून अमानुष छळ सहन करावा लागला आणि अखेर त्यांनी धर्म, सत्य आणि हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी बलिदान दिले. शीख इतिहासात त्यांना पहिले हुतात्मा गुरू मानले जाते. त्यांचे बलिदान केवळ शीख समाजासाठीच नव्हे, तर धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांसाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतीक मानले जाते. (Martyrdom of Guru Arjan Dev Sahib)
गुरू अर्जन देव यांचा जन्म १५६३ मध्ये झाला. त्यांनी शीख धर्माच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी शीख धर्मग्रंथाचे संकलन करून आदि ग्रंथ तयार केला, जो पुढे जाऊन गुरु ग्रंथ साहिब म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच त्यांनी हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) या पवित्र स्थळाच्या उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावली. (Martyrdom of Guru Arjan Dev Sahib)
(हेही वाचा – US – Iran War Ends : अमेरिका, इराणने तहावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्या केल्या म्हणजे नेमकं काय?)
इतिहासानुसार, गुरू अर्जन देव यांनी इस्लामसमोर झुकण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कठोर शिक्षा देण्यात आली. त्यांना तापलेल्या लोखंडी तव्यावर बसविण्यात आले आणि अंगावर उकळते पाणी टाकण्यात आले. अत्यंत वेदना सहन करूनही त्यांनी आपल्या श्रद्धेचा त्याग केला नाही. अखेरीस १६०६ मध्ये त्यांनी प्राणार्पण केले. त्यांच्या या बलिदानामुळे शीख धर्मात अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा अधिक दृढ झाली. (Martyrdom of Guru Arjan Dev Sahib)
गुरू अर्जन देव यांच्या हुतात्मा दिनानिमित्त देशभरातील गुरुद्वारांमध्ये विशेष कीर्तन, अरदास आणि लंगराचे आयोजन केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत तहानलेल्या लोकांना थंड पाणी, सरबत आणि अन्नदान करण्याची सेवा केली जाते. या सेवेतून त्यांच्या मानवतावादी विचारांची आठवण करून होते. त्यांचा संदेश आजही समाजाला शांतता, सहिष्णुता, समता आणि निःस्वार्थ सेवाभावाचे महत्त्व शिकवतो. (Martyrdom of Guru Arjan Dev Sahib)
(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi ने ड्रेसिंगरुमध्ये कुणाच्या पाया पडून घेतले आशीर्वाद? Video व्हायरल, चाहत्यांकडून कौतुक)
गुरू अर्जन देव यांचे जीवन आणि बलिदान हे श्रद्धा, धैर्य आणि मानवतेच्या मूल्यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. शतकानुशतके लोटल्यानंतरही त्यांचे विचार आणि त्याग लाखो लोकांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत आहेत. (Martyrdom of Guru Arjan Dev Sahib)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=3D7zjGwB_Pk
Join Our WhatsApp Community
