Veer Savarkar यांचा ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ लेख आता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात; वीर सावरकर मिशनकडून स्वागत

या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, 'वीर सावरकर मिशन'चे अध्यक्ष गंधार विश्राम कुलकर्णी यांनी या शैक्षणिक उपक्रमाबद्दल आभार मानले आहे. 

14

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग ३ च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar)  लिखित ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ या वैचारिक लेखाचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बहाटे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, ‘वीर सावरकर मिशन’चे अध्यक्ष गंधार विश्राम कुलकर्णी यांनी या शैक्षणिक उपक्रमाबद्दल आभार मानले आहे.  (Veer Savarkar)

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजावेत, या उद्देशाने वीर सावरकर  (Veer Savarkar) यांचा वैचारिक लेख अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. साहित्याचा अभ्यास केवळ भाषिक व साहित्यिक मूल्यांपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाह, सामाजिक प्रश्न, विज्ञानदृष्टी आणि तर्कशुद्ध चिंतन यांची ओळख करून देणारा असावा, या व्यापक दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला. साहित्याचा अभ्यास हा केवळ साहित्यिक मूल्यांपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाह, सामाजिक प्रश्न, विज्ञानदृष्टी आणि तर्कशुद्ध चिंतन यांची ओळख करून देणारा असावा, या व्यापक शैक्षणिक भूमिकेला आपल्या या निर्णयातून निश्चितच महत्त्व प्राप्त होते. आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान, विचार आणि विवेकाची नवी दृष्टी मिळत राहो, हीच अपेक्षा. मराठी भाषा, साहित्य, कोरकू बोली, भाषाविज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील आपले कार्य असेच निरंतर आणि व्यापक होत राहो, अशा शब्दांत गंधार कुलकर्णी यांनी त्यांच्या पत्रात शुभेच्छा दिल्या. (Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.