Health Tips : शरीरातील प्रथिनांची कमतरता ‘या’ शाकाहारी पदार्थांनी भरून काढा

110
Health Tips : शरीरातील प्रथिनांची कमतरता 'या' शाकाहारी पदार्थांनी भरून काढा
Health Tips : शरीरातील प्रथिनांची कमतरता 'या' शाकाहारी पदार्थांनी भरून काढा

हल्ली कमी वयात केस गळती, हाडे कमकुवत होणे असे त्रास जास्त प्रमाणात आढळतात. प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे पोषक तत्त्व आहे. शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते. काही जणांचा वाटते की, फक्त अंड्यातूनच प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात, पण तसे नाही. जे लोकं शाकाहारी आहेत किंवा ज्यांना अंड आवडत नाही, अंड्यामुळे अॅलर्जी होते, असे लोकं दररोजच्या शाकाहारातूनही प्रथिने मिळवू शकतात. यासाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे हाडं, त्वचा आणि केस यांचे आरोग्य सुधारते. शरीर निरोगी राहायला मदत होते शिवाय शरीराचा थकवाही भरून निघतो. पाहूया प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेले पदार्थ –

चिया सीड्स

चिया सीड्सना सुपरफूडस् असेही म्हटले जाते. यांच्या नियमित सेवनाने शरीराला प्रथिने मिळतात. रात्री चिया सीड्स पाण्यात भिजत घालून सकाळी सेवन करू शकता. यामुळे लाभ होऊ शकतो.

सुकामेवा

सुकामेव्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. बदाम, काजू प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहेत. नियमित खाल्ल्याने शरीर सुदृढ आणि निरोगी राहायला मदत होते. याशिवाय आहारातील फायबर आणि जीवनसत्त्व ई देखील सुकामेवा खाल्ल्याने शरीराला मिळू शकते.

मटार

हिरवे वाटाणे म्हणजेच मटारमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. यामध्ये जीवनसत्त्वे ए, के आणि सी जास्त प्रमाणात असतात शिवाय खनिजे आणि फायबरचे प्रमाणदेखील जास्त असते. शाकाहारींनी प्रथिनांच्या वाढीसाठी आहारात मटारचा समावेश करावा. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

(हेही वाचा – ISRO : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे पुढे काय होणार? इस्रोने दिली माहिती)

पनीर

एक कप पनीरमध्ये साधरणत: १२ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे आहारामध्ये पनीरचा समावेश केल्या जास्त प्रमाणात प्रथिने मिळू शकतात. आठवड्यातून किमान १-२ वेळा तरी पनीर खाणे गरजेचे आहे.

ओट्स

ओट्स हे सुपरफूड आहे. ओटस् खाल्ल्याने ह्रदयाचे आरोग्य सुधारते. कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासदेखील मदत होते.

मसूर

एक कप मसूराच्या डाळीत १८ ग्रॅम प्रथिने असतात. शाकाहारींना शरीरातील प्रथिनांचा स्त्रोत वाढवण्यासाठी मसूरच्या डाळीचा आहारात समावेश करावा. यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.