Mumbai attack : २६/११ हल्ला प्रकरणात चौथे आरोपपत्र दाखल, पाकिस्तानी कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोपपत्रात उल्लेख

53

मुंबईवर झालेल्या २६/११ चा दहशतवादी हल्ला (Mumbai attack) प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने चौथे आरोपपत्र दाखल केले आहे. ४०५ पानांचे हे आरोपपत्र असून या आरोप पत्रात पाकिस्तानी सैन्य दलातील माजी कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

तहव्वूर हुसैन राणा हा मुंबईत सन २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai attack) काही दिवस अगोदर मुंबईत होता, व तो डेव्हिड कोलमन हेडलीच्या सतत संपर्कात होता असे आरोपपत्रात म्हटले आहे. राणा हा हल्ल्यापुर्वी भारतातून कॅनडात गेला होता व सध्या तो कॅनडात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्लात (Mumbai attack) जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्या चौकशीत या हल्ल्याचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात महत्वाची माहिती आणि पाकिस्तान सैन्य दलातील माजी कॅप्टन तहव्वूर हुसैन राणा याचे नाव समोर आले होते.

राणाहल्लाच्या पाच दिवस अगोदर ११ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत होता व तो सतत डेव्हिड कोलमन हेडली याच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली, तपासा दरम्यान पोलिसांना अनेक दस्तऐवज सापडले ज्यावरून असे दिसून येते की राणाने केवळ सक्रिय सह-कारस्थानाची भूमिकाच दिली नाही, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात स्फोट घडवून आणण्यासाठी त्याचा सक्रिय सहभाग होता. हल्ल्यापूर्वी डेव्हिड कोलमन हेडलीच्या नियमित संपर्कात असणाऱ्या राणाने तलष्कर-ए-तैयबाला लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. तसेच लष्कर ए तैयबाला सर्व तपशील देऊन तसेच हेडलीला बनावट कागदपत्रांवर भारतीय पर्यटक व्हिसा मिळविण्यात मदत केली होती

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.