Influenza : इन्फ्लुएंझापासून कसा कराल मुलांचा बचाव ?

164
Influenza : इन्फ्लुएंझापासून कसा कराल मुलांचा बचाव ?
Influenza : इन्फ्लुएंझापासून कसा कराल मुलांचा बचाव ?

हवामान बदलामुळे व्हायरल फ्लू म्हणजेच ‘इन्फ्लुएंझा’च्या रुग्णांमध्ये वाढ होते. इन्फ्लुएंझामध्ये विशेषतः लहान मुलांच्या श्वसनमार्गावर परिणाम होतो. (Influenza) इन्फ्लूएंझाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. काही वेळा त्याची लक्षणे इतकी गंभीर असू शकतात की, मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते आणि मृत्यू होण्याचा धोका देखील असतो. लहान मुलांमध्ये इन्फ्लूएन्झाच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, खोकला, नाक वाहणे किंवा नाक बंद होणे यांचा समावेश होतो. इन्फ्लूएंझाचा उद्रेक बहुतेकदा हवामान बदलामुळे होतो. त्यामुळे अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. लहान मुलांना याची अधिक समस्या उद्भवू शकते. हवामान बदलामुळे मुले आजारी पडत असल्याचे त्याकडे दुर्लक्ष करू नका. ते इन्फ्लूएंझा फ्लूचे लक्षण असू शकते. पावसाळा आणि हिवाळ्यात तापमानात वारंवार चढ-उतार दिसून येतो. यामुळे व्हायरल फ्लूचे विषाणू झपाट्याने पसरतात. त्यामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांला भारतात ‘फ्लू सीझन’ म्हटले जाते. या काळात व्हायरल फ्लू अधिक वेगाने पसरतो. या ऋतूत मुलांना फ्लूपासून वाचवण्यासाठी योग्य काळजी घ्या, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.

(हेही वाचा – WhatsApp Chatbot : श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे ठिकाण शोधा बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन)

इन्फ्लूएंझा फ्लूची लक्षणे

इन्फ्लूएंझा व्हायरलमुळे श्वसन मार्गावर परिणाम होऊन श्वास घेण्यास अडचण येते. इन्फ्लूएंझा व्हायरल फ्लूमुळे ५ वर्षांखालील मुलांना रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही अनेक पटींनी वाढते. गंभीर प्रकरणांमध्येही मुले बरे होण्यासाठी 8 ते 10 दिवस लागू शकतात. इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू असून लक्षणे कोरोनाप्रमाणेच आहेत. ताप, खोकला आणि वाहणारे नाक, तसेच अंगदुखी, मळमळ इन्फ्लूएंझाची काही प्रमुख लक्षणे आहेत. यासोबतच उलट्या आणि पोटदुखी किंवा जुलाब यासारखी लक्षणेही दिसून येतात. (Influenza)

जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटले ?

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जगभरातील लहान मुलांचे 2022 मधील नियमित लसीकरण झालेले नाही.

सर्व प्रथम, मुलांना इन्फ्लूएंझा लस देणे आवश्यक आहे. व्हायरल फ्लूपासून संरक्षणासाठीचे हे पहिले पाऊल आहे. मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. अस्वच्छतेमुळे व्हायरल फ्लूचा प्रसार वेगाने होतो, असे तज्ञांनी सांगितले आहे. (Influenza)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.