Khalistan In Canada : कॅनडाच्या गायकाचा मुंबईतील शो रद्द; कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचा परिणाम

138
Khalistan In Canada : कॅनडाच्या गायकाचा मुंबईतील शो रद्द; कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचा परिणाम
Khalistan In Canada : कॅनडाच्या गायकाचा मुंबईतील शो रद्द; कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचा परिणाम

कॅनडास्थित पंजाबी गायक आणि रॅपर शुभनीत सिंग याचा मुंबईतील शो अखेर रद्द झाला आहे. (Khalistan In Canada) खलिस्तानला कथित पाठिंबा दिल्याने ते टीकेचे बळी ठरले आहेत. BookMyShow ने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये गायकाचा शो रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, ते 7-10 दिवसांच्या आत तिकिटांचा संपूर्ण परतावा करेल. भारताला कॅनडाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. अशा स्थितीत निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत हा शो रद्द करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Special Parliament Session : भाजपने ओबीसी व्यक्तीला पंतप्रधान केले; अमित शाह यांचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर)

भारतीय जनता युवा मोर्चाने केला विरोध

भारतीय जनता युवा मोर्चाने मूळच्या कॅनडाच्या या गायकाची कॉन्सर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. याशिवाय कार्यकर्त्यांनी गायकाचे पोस्टरही फेकून दिले होते. सोशल मीडियावर शुभनीत सिंगने खलिस्तानचे खुलेआम समर्थन केल्याचा आरोप करण्यात आला होता. शुभ 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुंबईत त्याचा शो करणार होता. यानंतर ते 6 ऑक्टोबरला चंदीगड आणि 7 ऑक्टोबरला लुधियाना येथे येत आहेत, मात्र त्यांच्या आगमनापूर्वीच युवा मोर्चाच्या नेत्यांनी मुंबईत निदर्शने करत शुभच्या शोचे पोस्टर फाडले. सध्या त्याचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. शुभचा मुंबईतील कार्यक्रम रद्द न केल्यास त्याच्याविरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता. (Khalistan In Canada)

शुभ उर्फ ​​शुभनीत सिंग याच्या वादग्रस्त पोस्ट

मुंबईत रॅपर आणि गायक शुभ उर्फ ​​शुभनीत सिंगची कॉन्सर्ट आयोजित केली जाणार होती. हा शो कॉर्डेलिया क्रूजवर होणार होता. या शोला मोठा विरोध झाला होता. अलीकडेच ​​शुभनीत सिंग याने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये ‘प्रे फॉर पंजाब’ असे लिहिले. त्यानंतर लोक संतापले आहेत. इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी त्याने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये पंजाब आणि जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशावरून गायब असल्याचे दाखवण्यात आले होते. जेव्हा पंजाब पोलीस खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंगचा शोध घेत होते, तेव्हा शुभने ही पोस्ट केली होती. (Khalistan In Canada)

दरम्यान, ब्रिटिश कोलंबियातील प्रमुख शीख नेते आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या सरकारने कारवाई करून एका भारतीय उच्चाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. याबरोबर हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे आरोप १८ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेत चर्चेत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले आहेत. (Khalistan In Canada)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.