स्मार्टफोन हरवला किंवा चोरी झाल्यास असे करा UPI अकाउंट Deactivate! जाणून घ्या प्रक्रिया

92

कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर आपण अलिकडे डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैसे देतो. कॅशलेस व्यवहार करणे प्रत्येकाला सोपे झाले आहे. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही छोट्या किराणा दुकानांपासून ते मॉल्सपर्यंत आपण सगळीकडे UPI पेमेंटचा वापर करतो. परंतु तुमचा फोन हरवला किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला तर तुमचे बॅंक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते. म्हणूनच UPI payment वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुमचा फोन जरी हरवला तरी तुम्ही तुमचे UPI निष्क्रिय (deactivate) करू शकता.

( हेही वाचा : ऐन पावसाळ्यात पाणी संकट! ‘या’ भागातील पाणी पुरवठा १५ जुलैला ४ तास बंद)

UPI Account Deactivate करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा…

  • तुमचा फोन चोरी झाला किंवा हरवला तर तुम्ही तात्काळ तुमच्या मोबाईल नेटवर्कच्या customer care executive ला कॉल करा आणि तुमचा मोबाइल नंबर आणि सिम त्वरित निष्क्रिय करण्यास सांगा.
  • सिम ब्लॉक करण्यासाठी customer care executive तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, शेवटचे रिचार्ज, ईमेल आयडी इत्यादी माहिती सांगावी लागेल.
  • यासोबतच तुमच्या बॅंकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्हाला तुमचे बॅंक खाते ब्लॉक करण्यास आणि UPI सेवा बंद करण्यास सांगावे लागेल.
  • या दोन पर्यायांद्वारे तुम्ही अगदी सहज तुमची UPI सेवा बंद करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.