Health Benefits: दही-पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर…

43
Gopalkala: गोपाळकाल्याच्या दिवशी दही-पोह्यांच्या प्रसादाचे महत्त्व, वाचा सविस्तर...
Gopalkala: गोपाळकाल्याच्या दिवशी दही-पोह्यांच्या प्रसादाचे महत्त्व, वाचा सविस्तर...

आज श्री कृष्ण जन्मोत्सव! कृष्णभक्तांसाठी पर्वणीचा दिवस. या दिवशी अनेक ठिकाणी भजन, किर्तन, उपवास…अशा कृष्णभक्तीत तल्लीन करणाऱ्या गोष्टी केल्या जातात. या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. कृष्ण मंदिरात पाळणा म्हटला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सणही साजरा केला जातो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. या दिवशी दही-पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. जाणून घेऊया, या दिवशी दही-पोहे खाण्याचे महत्त्व –

लहानपणी भगवान श्रीकृष्ण ज्याप्रकारे गोकुळात शेजाऱ्यांच्या घरातून दही, दूध आणि लोण्याचे भांडे फोडत असत, तेव्हा सुख-समृद्धी येत असे, असे मानले जाते. दही-पोह्यांच्या प्रसादाला ‘काला’, असे म्हणतात. पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे काल्यातील प्रमुख घटक आहेत.

गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो.म्हणून याला ‘काला’ असे म्हटले जाते. या दिवशी श्रीकृष्ण स्मरणार्थ काला करून प्रसाद वाटला जातो.

(हेही वाचा – Veer Savarkar : गणेशोत्सवात देखाव्यांतून उलगडणार सावरकरी महात्म्य; हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासनातर्फे ‘देखावा स्पर्धा’)

दही-पोह्यांचे आरोग्यदायी फायदे…
पोहे पचायला सोपे असतात त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य नियंत्रित रहाते.दह्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पोह्यामध्ये कर्बोदके असल्याने ते ऊर्जा देतात तसेच दह्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. अशक्तपणावर मात करायला पोह्यातील लोहाची मदत होते.वजन कमी करण्यासाठी पोहे उत्तम पर्याय आहे, कारण त्यात ग्लूटेन कमी आहे.दह्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या पोटात होणारी जळजळ थांबते. अॅसिडिटीची समस्या कमी होते. दही सांध्याच्या दुखण्यावर फायदेकारक असते.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.