Veer Savarkar : गणेशोत्सवात देखाव्यांतून उलगडणार सावरकरी महात्म्य; हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासनातर्फे ‘देखावा स्पर्धा’

प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार आणि जीवनकार्य गणेशोत्सवात देखाव्यांच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे.

149
Veer Savarkar : गणेशोत्सवात देखाव्यांतून उलगडणार सावरकरी महात्म्य; हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासनातर्फे 'देखावा स्पर्धा'
Veer Savarkar : गणेशोत्सवात देखाव्यांतून उलगडणार सावरकरी महात्म्य; हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासनातर्फे 'देखावा स्पर्धा'

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार आणि जीवनकार्य गणेशोत्सवात देखाव्यांच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे. सावरकरी महात्म्य घराघरांत पोहोचवण्यासाठी हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या राज्यस्तरीय देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वीर सावरकरांच्या जीवनातील प्रसंग, कार्य, धैर्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व या एक किंवा अनेक बाबींना मूर्त रूपात व्यक्त करणारे देखावे सादर करणाऱ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ लाखांचा निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याची माहिती हर घर सावरकर समितीचे सदस्य चंद्रशेखर साने यांनी दिली.

महाराष्ट्राच्या सहा विभागांतून, ३६ जिल्ह्यांतून सर्वोत्कृष्ट गणेश देखावा निवडला जाणार आहे. अंदमानची सहल, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन, तसेच वीर सावरकरांच्या समग्र जीवनावर आधारित देखावा सादर करणाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी गूगल फॉर्मची लिंक आणि त्याचा QR कोड १९ सप्टेंबरला हर घर सावरकर या फेसबूक पेजवर प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती साने यांनी दिली. या स्पर्धेत कौटुंबिक, सोसायटी, मित्रमंडळ, शाळा किंवा सार्वजनिक मंडळे यापैकी कोणत्याही स्तरावर भाग घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Woman Constable Attacked in Train : धक्कादायक ! चालत्या रेल्वेत महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात; न्यायाधिशांनी रात्री ९.३० वाजता स्वतःच्या घरी घेतली विशेष सुनावणी)

‘ही’ आहेत बक्षिसे –

या स्पर्धेसाठी राज्य शासनाने १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून प्रथम तीन विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. शिवाय इलेक्ट्रिक स्कूटर, अंदमानची सहल, टिलर ट्रॅक्टर, ५४ इंच एलईडी टिव्ही, रेफ्रिजरेटर, सोलर वॉटर पंप, मायक्रोवेव्ह ओव्हन, सायकल, डिनर सेट, इंडक्शन शेगडी अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी यशवंत अकोलकर – ९४२२००४६५३, प्रशांत चव्हाण – ९०२८०९४३८६, ओंकार आपटे – ७०२०६४४१४१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.