Woman Constable Attacked in Train : धक्कादायक ! चालत्या रेल्वेत महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात; न्यायाधिशांनी रात्री ९.३० वाजता स्वतःच्या घरी घेतली विशेष सुनावणी

35
Woman Constable Attacked in Train : धक्कादायक ! चालत्या रेल्वेत महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात; न्यायाधिशांनी रात्री ९.३० वाजता स्वतःच्या घरी घेतली विशेष सुनावणी
Woman Constable Attacked in Train : धक्कादायक ! चालत्या रेल्वेत महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात; न्यायाधिशांनी रात्री ९.३० वाजता स्वतःच्या घरी घेतली विशेष सुनावणी

सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (Woman Constable Attacked in Train) 30 ऑगस्टला अयोध्या स्थानकावर सरयू एक्स्प्रेसमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. तसंच तिच्या कवटीला दोन फ्रॅक्चर होते. रेल्वे अयोध्या स्थानकावर पोहोचली, तेव्हा महिला अयोध्या रक्ताच्या थारोळ्यात आढळली. त्यानंतर त्यांना लखनऊच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रेल्वे संरक्षण दलाने दिली आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. महिला कॉन्स्टेबलच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 332 (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने हानी पोहोचवणे), 353 (सरकारी कर्मचाऱ्याला त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेच पुरावे हाती नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. (Woman Constable Attacked in Train)

हायकोर्टाने स्वत: दखल घेऊन रेल्वे संरक्षण दलाला फटकारले 

महिला हवालदार रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. रविवारी मुख्य मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर आपल्या घरी बसलेले असताना त्यांच्या व्हॉट्सअपवर या घटनेसंबंधी मेसेज आला. यानंतर त्यांनी त्या मेसेजच्या आधारे कारवाई केली. त्यांनी एक खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश दिला. ज्यामध्ये ते स्वत: आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव सहभागी झाले. हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली असून, कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारले आहे. कर्तव्य नीट न पाडल्याने मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी आरपीएला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकार रेल्वे पोलिसांना 13 सप्टेंबरपर्यंत या घटनेप्रकरणी प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर यांनी रविवारी रात्री आपल्या घऱी विशेष कोर्ट भरवले आणि याचिका दखल करत रात्री सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी फक्त नाराजी जाहीर केली नाही, तर राज्य सरकार आणि रेल्वेला नोटीस जारी केली. रविवारी सुट्टी असतानाही रात्री 9.30 वाजता विशेष कोर्टाने सुनावणी घेतल्याची इतिहासात नोंद होणार आहे.

“या घटनेवरून भारतीय रेल्वे कायद्यातील काही तरतुदींचे सर्रास उल्लंघन झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवाय, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियम आणि नियमांची अंमलबजावणी करण्यात रेल्वे संरक्षण दलही त्यांचं कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. सध्याची घटना केवळ महिलांविरुद्धचा गुन्हा नाही तर संपूर्ण समाजाविरुद्ध आहे. या घटनेमुळे महिलांचं मानसशास्त्र उद्ध्वस्त झालं आहे,’ असं हायकोर्टाने म्हटलं आहे. (Woman Constable Attacked in Train)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.