Gavati Chaha Leaves : पावसाच्या दिवसांत चहात ‘हा’ पदार्थ टाकून पहा

पावसाच्या दिवसांत राज्यात हमखास गवती चहा मोठ्या प्रमाणात मिळतो

209
Gavati Chaha Leaves : पावसाच्या दिवसांत चहात 'हा' पदार्थ टाकून पहा
Gavati Chaha Leaves : पावसाच्या दिवसांत चहात 'हा' पदार्थ टाकून पहा

पावसाच्या दिवसांत राज्यात हमखास गवती चहा मोठ्या प्रमाणात मिळतो. गवती चहाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असल्याने गवती चहाच्या पाण्याचे दररोज सकाळी सेवन करणे फायदेशीर ठरते. सकाळच्या चहात गवती चहा टाकून उकळून प्यायल्यास बऱ्याचजणांना फायदा होत असल्याचे आयुर्वेदचाऱ्यांनी सांगितले.

गवती चहाचा रस श्वसन विकाराच्या आजारासाठी उत्तम उपाय असतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला तसेच श्वसनाचे विकार झाल्यास अनवशी पोटी गवती चहाचे कोमट पाणी पिण्याचा सल्ला आयुर्वेद देते. गवती चहा हा आयुर्वेदात गुणकारी मानला जातो. दिवसातून किमान दोनवेळा गवती चहाचे पाणी घेतल्यास आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. सततच्या सेवनाने दमा आणि दर ऋतूमानाला सर्दीचा त्रास होणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले.

(हेही वाचा – Airpods Manufacturing in Hyderabad : हैद्राबादमध्ये बनणार ॲपलचे एअरपॉड्स)

चहा बनवताना चहा पावडर आणि गवतीचहा या दोन साहित्याच्या वापरातून चहा बनवल्यास आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. सध्या गवती चहा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा भरपूर प्रमाणात वापर करण्याचा सल्ला आयुर्वेद डॉक्टरांनी दिला आहे. घशाला खवखव किंवा खोकला असल्यास चहात दूध टाकू नये.

गवती चहा बनवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत –

एक ग्लास पाणी पातेल्यात उकळत ठेवा. पाणी उकळू लागल्यास त्यात अर्धा वाटी कापलेला गवती चहा टाका. पाणी मोठ्या आचेवर उकळावे. पाणी आटून अर्धा ग्लास झाल्यास चहा तयार होतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.