Marathwada Drought : जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट

103
Marathwada Drought : जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार (Marathwada Drought) पावसाने हजेरी लावली होती. या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन देखील विस्कळीत झाले. मात्र अजूनही मराठवाडा (Marathwada Drought) कोरडाच आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात केवळ 34 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मराठवाड्यातील (Marathwada Drought) काही ठिकाणी तर गेल्या 20 दिवसांत पावसाचा एक थेंब देखील पडला नाही. त्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाची स्थिती ओढवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 34.11 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी आजच्या दिवशी याच जायकवाडी धरणात 94.99 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

(हेही वाचा – Crime : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या मुंबईतील दोन तरुणांना अटक)

जायकवाडी धरणातील पाणीसाठा

धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.13 फूट
धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.373 मीटर
एकूण पाणीसाठा दलघमी : 1478.589 दलघमी
जिवंत पाणीसाठा दलघमी : 740.483 दलघमी
जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 34.11 टक्के
जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.586

मागील वर्षी आजच्या दिवशीचा जलसाठा

मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2062.271 दलघमी
मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 94.99 टक्के
जायकवाडी पाण्याची आवक क्युसेक : 00
1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 237.313 दलघमी
1 जून 2023 पासुन एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.