डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खालावली? ‘या’ दोन वनस्पतींचा रस प्यायल्यास मिळेल आराम

267
डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खालावली? 'या' दोन वनस्पतींचा रस प्यायल्यास मिळेल आराम
डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खालावली? 'या' दोन वनस्पतींचा रस प्यायल्यास मिळेल आराम

पावसाळ्याचे आगमन झाले की त्यासोबत अनेक आजारांना निमंत्रण मिळते. पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊन डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवतो. दर वर्षी डेंग्यूच्या आजारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खालावल्यामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. जर तुम्हालाही या आजारातून बरे व्हायचे असल्यास काही वनस्पतींचा रस रामबाण उपाय ठरु शकतो.

डेंग्यू हा एडिस इजिप्ती जातीचा डास चावल्यामुळे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. त्या डासाच्या शरीरावर पांढरे पट्टे असल्याने त्याला ‘टायगर मॉस्किटो’ असेही म्हणतात. या डासाच्या अळ्या स्वच्छ पाण्यात वाढतात आणि दिवसा चावतात. डेंग्यूचा डास डंख मारून त्याचे विषाणू मानवी शरीरात पसरवतो, नंतर तो दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्याच्या शरीरातही संसर्ग होतो. साधारणपणे हे डास १६ ते ३० अंश तापमानात जास्त वाढतात, त्यामुळे पावसाळा हा त्याच्या प्रजननासाठी योग्य काळ असतो.

डेंग्यूच्या तापात प्लेटलेटची संख्या होते कमी

एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रति मायक्रोलिटर रक्तातील प्लेटलेट्स १,५०,००० ते २,५०,००० दरम्यान असतात, परंतु जेव्हा डेंग्यूचा डास चावल्यानंतर ताप येतो तेव्हा ही संख्या सामान्यतः १ लाखाच्या खाली येते, ज्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

(हेही वाचा – स्थानिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही; राज्य निवडणूक आयोगाचा खुलासा)

डेंग्यू झाल्यावर या २ वनस्पतींचा रस प्या –

१. पपईच्या पानांचा रस

जेव्हाही तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला डेंग्यू ताप येऊन प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते तेव्हा लगेच पपईच्या पानांचा रस काढून प्यावा, लवकरच फायदा होईल.

२. गुळवेलीचा रस

गुळवेल ही अशी वनस्पती आहे की तिला आयुर्वेदाचे वरदान म्हटले तर वावगे ठरणार नाही. डेंग्यूचा ताप वाढला की त्याचा रस काढून लगेच प्यावा, त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढते आणि बरे होण्यास मदत होते.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.