मुलांना शालेय शिक्षणासोबतच क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास शाळेच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक क्रीडा उपक्रम सुरु आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तलवारबाजी (Fencing), मुष्टियुद्ध (Boxing), तिरंदाजी (Archery) आणि नेमबाजी (Shooting) प्रशिक्षणाच्या सोयीचा लाभ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घेता येतो. जागतिक स्तरावर खेळले जाणारे खेळ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संबंधित क्रीडाप्रकारातील तज्ञ प्रशिक्षकांमार्फत शिकवले जातात. छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह पालकांना 13 जूनला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात तलवारबाजी, मुष्टियुद्ध, तिरंदाजी, आणि नेमबाजीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रात्यक्षिकांसह क्रीडा प्रकारांची प्राथमिक माहितीही यावेळी देण्यात आली. या उपक्रमाबद्दल पालकांनी छबिलदास शाळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे आभार मानले. Orientation मुळे मुलांना नेमका कोणता क्रीडा प्रकार शिकवायला हवा, याचा निर्णय घेता येईल, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak)
Join Our WhatsApp CommunityHome एक्सक्लुसिव्ह Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak आणि छबिलदास शाळेचा संयुक्त ऑलिम्पिक क्रीडा उपक्रम

