Iran vs Israel War : इराणने ताब्यात घेतलेल्या इस्राईलच्या मालवाहू जहाजात १७ भारतीय अडकले

170

सध्या इराण आणि इस्राईल या दोन देशांमध्ये युद्धजन्य (Iran vs Israel War) स्थिती निर्माण झाली आहे. दोन देशांमध्ये केव्हाही मोठे युद्ध पेटू शकते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने शनिवारी, १३ एप्रिल रोजी होर्मुझच्या समुद्रात इस्रायलचे  “एमएससी एरीज’ हे मालवाहू जहाज ताब्यात घेतले. या जहाजात 17 भारतीय देखील आहेत, त्यानंतर भारत सरकारला आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीची चिंता वाढली आहे. या कारवाईमुळे हा महत्त्वाचा शिपिंग मार्ग बंद होऊ शकतो, असे इराणने म्हटले आहे. इराणने सीरियन वाणिज्य दूतावासावर इस्त्रायली हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशाराही दिला आहे.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar Film : वीर सावरकरांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी नाशिकमधील तरुणांचा अनोखा उपक्रम)

भारताने इराणशी संपर्क साधला

त्याचवेळी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, इस्रायली कंटेनर जहाजावर उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारताने इराणशी संपर्क साधला आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षित आणि लवकर सुटका सुनिश्चित करण्यासाठी भारत तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. १२ दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराण तेहरान इस्रायलवर मोठा हल्ला करू शकते, अशी भीती वाढत चालली आहे. (Iran vs Israel War)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.