सरकारने काढली अधिसूचना ; Bournvita ‘हेल्थ ड्रिंक’ कॅटेगरीतून काढून टाका…

बोर्नव्हिटा आणि इतर शीतपेये हेल्थ ड्रिंक्स ऑनलाईन साइटवरून कायमचे जाणार

198
Bournvita: हेल्थ ड्रिंकच्या श्रेणीतून 'बोर्नविटा'ला वगळले, कारण? वाचा सविस्तर...

मुलांची वाढ वाढविण्याचा दावा करणारी बोर्नव्हिटासारख्या (Bournvita) अनेक हेल्थ ड्रिंक्स संदर्भात केंद्र सरकारने १० एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, “सर्व ई-कॉमर्स कंपन्या (E-commers) व पोर्टलर्स (Portals) यांनी ऑनलाईन साइटवरून “हेल्थ ड्रिंक्स” (Health Drink) या श्रेणीतून बोर्नव्हिटासह सर्व पेये काढून टाकण्याचा आदेश दिले आहेत. तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करत असे निर्देश दिले.

(हेही वाचा – Bhavana Gawali यांची नाराजी दूर; राजश्री पाटलांचा प्रचार करणार

परिपत्रकात नेकमं काय म्हटलंय ?

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने या महिन्याच्या सुरुवातीला सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना डेयरी आधारित, धान्य किंवा माल्ट आधारित पेय पदार्थाना हेल्दी ड्रिंग्स किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून लेबल न करण्याबाबत निर्देश दिले होते. बोर्नव्हिटा आणि इतर शीतपेये हेल्थ ड्रिंक्सच्या श्रेणीत ठेवू नयेत, असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, बाल अधिकार संरक्षण आयोग (सीपीसीआर) कायदा २००५ च्या कलम (३) अंतर्गत एक स्थापन केलेल्या संस्थेने तपास केला. या तपासात हे हेल्थ ड्रिंक्सच्या व्याख्येत बसत नसल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – मोठ्या संख्येने मतदान करून मोदीजींना पुन:श्च पंतप्रधान करा; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे आवाहन )

FSSAI कडून ई-कॉमर्स वेबसाईट्सना सूचना

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत ‘हेल्थ ड्रिंक्स’ची कोणतीही व्याख्या नाही. हे लक्षात घेऊन, ई-कॉमर्स कंपन्या (E-commerce companies) आणि वेबसाइट्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘हेल्थ ड्रिंक्स’ श्रेणीतून बोर्नव्हिटासह सर्व पेये काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. FSSAI कडून ई-कॉमर्स वेबसाईट्सना सूचना देण्यात आल्या की चुकीच्या शब्दांचा वापर केल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. तसेच एनर्जी ड्रिंक्स हा शब्द फक्त कार्बोनेटेड आणि नॉन- कार्बोनेटेड पाण्यावर आधारीत पेयांसारख्या उत्पादनांसाठी वापरण्यास परवानगी आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.