Ali Dawood Amich : इराण-अमेरिका यांच्यात तणाव वाढलेला असताना इस्रायलने मोठी कारवाई केली आहे. रविवारी इस्रायल डिफेन्स फोर्सेसने हिज्बुल्लाहचा दहशतवादी अली दाऊद अमीच याला लक्ष्य करून ठार केल्याचे उघड झाले आहे. दाऊद अमीच हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग विभागातील एका शाखेचा प्रमुख होता. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. आयडीएफच्या माहितीनुसार, अमीच दहशतवादी दक्षिण लेबनॉनमधील अल-दुवैर परिसरात हिज्बुल्लाहसाठी लष्करी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होता.(Ali Dawood Amich)
दरम्यान, इस्रायली सुरक्षा दलांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “अली दाऊद अमीच याचा खात्मा करण्यात आला आहे. अमीच हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग विभागात ब्रँच हेड म्हणून काम करत होता. अल-द्वेइर परिसरात दहशतवादी पायाभूत रचना पुन्हा उभारणे आणि आयडीएफ सैनिकांविरोधातील हल्ले पुढे नेण्यामध्ये गुंतलेला होता. दहशतवाद्याच्या हालचाली इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील करारांचे उल्लंघन करणाऱ्या होत्या.”(Ali Dawood Amich)
(हेही वाचा Union Budget 2026 : समर्थ सरकारचा संयत आणि सजग अर्थसंकल्प; ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन )
इस्रायल व हिज्बुल्लाह यांच्यात २७ नोव्हेंबर २०२४ पासून युद्धबंदी लागू आहे. मात्र, तरीही हिज्बुल्लाहकडून धोका असल्याचा दावा करत इस्रायलने लेबनॉनमध्ये कारवाया सुरूच ठेवल्या. इस्रायलने लेबनॉन सीमेच्या जवळ पाच महत्त्वाच्या ठिकाणी आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. ताज्या कारवाईबाबत इस्रायली सैन्याने निवेदन जारी करत म्हटले की, मजरात अब्बूदिये परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वाहनांना लक्ष्य करण्यात आले.(Ali Dawood Amich)
लेबनॉनच्या सरकारी नॅशनल न्यूज एजन्सीनुसार, मरजेयौन जिल्ह्यातील राब थलातीन गावात इस्रायली दलांनी सकाळच्या सुमारास घुसखोरी करून दोन घरे स्फोटकांनी उद्ध्वस्त केली, ज्यामुळे आसपासच्या घरांचेही नुकसान झाले. रविवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक घरे व वाहनांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इस्रायली व लेबनानी सूत्रांच्या हवाल्याने काही शेतजमिनींवर विषारी पदार्थांची फवारणी करण्यात आल्याचाही दावा केला जात आहे.(Ali Dawood Amich)
Join Our WhatsApp Community

