Afsar Pasha : नितीन गडकरींना धमकी देणारा दहशतवादी अफसर पाशा मेडिकल रुग्णालयात दाखल

छातीत दुखल्यामुळे रुग्णालयात दाखल

119
Afsar Pasha : नितीन गडकरींना धमकी देणारा दहशतवादी अफसर पाशा मेडिकल रुग्णालयात दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला दहशतवादी (Afsar Pasha) अफसर पाशा याला सोमवारी १७ जुलै रोजी मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौकशीदरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पाशाची आरोग्य तपासणी सुरू होती.

गडकरी धमकी प्रकरणी कांथा ऊर्फ जयेश पुजारी ऊर्फ शाकीर याच्या चौकशीदरम्यान अफसर (Afsar Pasha) पाशाची ‘लिंक’ समोर आली होती. पोलिसांनी त्याला बेळगाव येथील हिंदलगा कारागृहातून अटक केली. त्यानंतर १५ जुलै रोजी अफसर पाशा याला विमानाने नागपुरात आणण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अफसर पाशा याचे नागपूरशी जुने ‘कनेक्शन’ असल्याची बाब समोर आली होती. यापूर्वी २००३ ते २००४ या काळात अफसरने नागपुरात राहून दहशतवादी संघटनेची मुळे घट्ट करण्याचे काम केले होते. पोलिस कोठडीत पाशाची सखोल चौकशी सुरू असताना सोमवारी दुपारनंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने छातीत दुखत असल्याचा दावा केला. कुठलीही जोखीम नको म्हणून पोलिसांनी त्याला संध्याकाळी मेडिकल रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्याच्यासोबत तीसहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी होते. डॉक्टरांकडून त्याची तपासणी व विविध टेस्ट करण्यात आले.

(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी; जुलै २१ पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा)

गेल्या दोन दिवसातील चौकशीत पाशाकडून मिळालेल्या माहितीनुसार अफसर पाशा (Afsar Pasha) याने कार मेकॅनिकचे प्रशिक्षण घेतले होते व तो काही काळ सौदी अरेबियात नोकरीला होता. अफसर पाशा कर्नाटकच्या बंगळुरू शहरातील एका कामगाराचा मुलगा आहे. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने कार दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. सौदीतील एका कार बनविणाऱ्या मोठ्या कंपनीत त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. त्याठिकाणी ३ वर्षे काम केल्यानंतर त्याचा संपर्क पाकिस्तानातील लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी आला. त्याने बांगलादेशमध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतरच त्याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.