Out Of Poverty : पाच वर्षांच्या कालावधीत साडेतेरा कोटी भारतीयांची बहुआयामी गरिबीतून मुक्तता

ग्रामीण भागातील गरिबीत ३२.५९% वरुन १९.२८% अशी जलद गतीने घसरण

105
Out Of Poverty : पाच वर्षांच्या कालावधीत साडेतेरा कोटी भारतीयांची बहुआयामी गरिबीतून मुक्तता

नीती आयोगाच्या (Out Of Poverty) ‘राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक : प्रगती आढावा अहवाल २०२३’ या अहवालामधील माहिती नुसार वर्ष २०१५-१६ ते २०१९-२१ या काळात साडेतेरा कोटी इतक्या विक्रमी संख्येने लोक बहुआयामी गरिबीतून मुक्त (Out Of Poverty) झाले आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर.सुब्रमण्यम तसेच आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल आणि डॉ.अरविंद वीरमाणी यांच्या उपस्थितीत आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी सोमवार, १७ जुलै रोजी या अहवालाचे प्रकाशन केले.

अलीकडच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावर (एनएफएचएस-५ (२०२०-२१)) आधारलेला राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक (Out Of Poverty) (एमपीआय) एनएफएचएस-४ (२०१५-१६) आणि एनएफएचएस-५ (२०१९-२१) या सर्वेक्षणाच्या मधल्या काळात बहुआयामी गरिबी कमी करण्याबाबत भारताने केलेल्या प्रगतीचे प्रतिनिधित्व करतो.नोव्हेंबर २०२१ मध्ये जारी करण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय एमपीआयवर हा अहवाल आधारित आहे. जागतिक पद्धतींशी समन्वय साधून विस्तृत पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Afsar Pasha : नितीन गडकरींना धमकी देणारा दहशतवादी अफसर पाशा मेडिकल रुग्णालयात दाखल)

या अहवालानुसार, भारतात वर्ष २०१५-१६ मध्ये असलेल्या २४.८५% बहुआयामी गरिब (Out Of Poverty) व्यक्तींच्या संख्येत ९.८९% ची लक्षणीय घसरण नोंदवत वर्ष २०१९-२१ मध्ये ती १४.९६% झाली. या काळात देशातील ग्रामीण भागातील गरिबी सर्वात जलद गतीने ३२.५९% वरुन कमी होऊन १९.२८% झाली. याच कालावधीत शहरी भागातील गरिबीचे प्रमाण ८.६५% वरुन ५.२७% इतके झाले. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त प्रमाणात गरिबी कमी झाली असून राज्यातील ३.४३ कोटी जनता बहुआयामी गरिबीच्या विळख्यातून मुक्त झाली आहे. देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि ७०७ प्रशासकीय जिल्ह्यांसाठी बहुआयामी गरिबीबाबतचा अंदाज व्यक्त करणारा हा अहवाल म्हणतो की उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये बहुआयामी गरिबांच्या संख्येत सर्वाधिक घट दिसून आली.

शाश्वत तसेच न्याय्य विकासाची सुनिश्चिती करुन तसेच वर्ष २०३० पर्यंत गरीबीचे (Out Of Poverty) निर्मुलन करून शाश्वत विकास ध्येयांप्रतीची वचनबद्धता पूर्ण करण्यावर सरकारने धोरणात्मक पद्धतीने लक्ष एकाग्र केले आहे हेच यातून दिसून येते.

स्वच्छता, पोषण, स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक समावेशकता, पेयजल तसेच वीज पुरवठा यांमध्ये सुधारणा करण्यावर सरकारने समर्पितपणे लक्ष केंद्रित केले असून त्यामुळे या क्षेत्रांत लक्षणीय प्रमाणात सफलता मिळाली आहे. एमपीआय मधील सर्वच्या सर्व १२ निर्देशाकांमध्ये उल्लेखनीय सुधारणा दिसून आली आहे. पोषण अभियान तसेच अॅनिमियामुक्त भारत यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांनी आरोग्याच्या क्षेत्रातील वंचितता कमी करण्यात योगदान दिले आहे. स्वच्छ भारत अभियान (एसबीएम) आणि जल जीवन अभियान (जेजेएम) यांसारख्या उपक्रमांनी देशातील स्वच्छतेमध्ये सुधारणा घडवली आहे.पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून (पीएमयुवाय)देण्यात येणाऱ्या अनुदानित दरातील स्वयंपाकाच्या गॅसमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले असून स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई कमी करण्यात १४.६ टक्क्यांची सुधारणा झाली आहे. सौभाग्य, पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय), पंतप्रधान जन धन योजना (पीएमजेडीवाय) आणि समग्र शिक्षण या उपक्रमांनी देखील देशातील बहुआयामी गरीबीचे प्रमाण कमी करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.