Navnath Ghadge : महापालिकेचे कार्यकारी अभियंते नवनाथ घाडगे मराठा सेवा संघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी

160
Navnath Ghadge : महापालिकेचे कार्यकारी अभियंते नवनाथ घाडगे मराठा सेवा संघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या मराठा सेवा संघ महाराष्ट्रच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता (Navnath Ghadge) नवनाथ घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील ८ जुलै २०२३ रोजी कार्यकारी अभियंता नवनाथ घाडगे यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Out Of Poverty : पाच वर्षांच्या कालावधीत साडेतेरा कोटी भारतीयांची बहुआयामी गरिबीतून मुक्तता)

मुंबई महापालिकेत कार्यकारी अभियंता पदी कार्यरत असलेले नवनाथ घाडगे (Navnath Ghadge) हे महापालिकेतील अभियंता संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती मराठा सेवा संघ महाराष्ट्रच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी झाल्याने पदाधिकाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. मुंबई महापालिकेत अभियंत्यांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करत त्यांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनाथ घाडगे यांना आपल्या या अनुभवाचा फायदा संघाचे कार्य पुढे नेऊन जाण्यास कामी येणार आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर महापालिकेचे अधिकारी व अभियंते यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.