मुंबईत होणाऱ्या अपघातस्थळाच्या विश्लेषणासाठी वाहतूक विभागाचे विशेष पथक

160
मुंबईत होणाऱ्या अपघातस्थळाच्या विश्लेषणासाठी वाहतूक विभागाचे विशेष पथक
मुंबईत होणाऱ्या अपघातस्थळाच्या विश्लेषणासाठी वाहतूक विभागाचे विशेष पथक

रस्त्यावर होणारे अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे किंवा रस्त्यावर येणाऱ्या अडथळांमुळे होतात, या अपघातात नाहक अनेकांचा बळी जात असतो. मुंबईत होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून काढणे आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे. जे पथक अपघातस्थळी जाऊन त्याचे विश्लेषण करून त्यातील त्रुटीचा अहवाल संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.

मुंबई आणि उपनगरात या वर्षी जून महिन्यापर्यत १२१ जीवघेण्या अपघातात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३११ अपघातांमध्ये ३७९ जखमी झाले आहे. मुंबईत झालेल्या अपघातांपैकी १२१ प्राणघातक अपघात ठिकाणीची यादी वाहतुक पोलिसांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने तयार केली आहे. पूर्वमुक्त महामार्ग वरील शिवाजी नगर दर्ग्याबाहेर गोवंडी-पांजरापोळकडे जाणारा उत्तरेकडील रस्ता हा १२१ प्राणघातक अपघातांपैकी एक आहे. वाहतुक पोलिसांच्या विशेष पथकाने सर्वात प्रथम या ठिकाणी भेट देऊन संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपघाताच्या गुन्ह्या संबंधित माहितीवरून तसेच स्थानिक नागरिक, वाहन चालक यांच्याशी चर्चा करून त्याच बरोबर स्वतः अपघातस्थळाची पाहणी केली, तसेच वाहतूक पोलिसांच्या तीन सदस्यीय पथकाकडून ३० मे रोजी, फ्रीवेवर झालेल्या प्राणघातक अपघातांचे विश्लेषण करण्यात आले.

अपघाताच्या विश्लेषणानंतर वाहतूक पोलिसांच्या पथकाला अपघातस्थळावरील फ्रीवेच्या सीमा भिंतीची उंची ही अडीज फूट असल्याचे आढळून आले. ही भिंत पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यापासून रोखण्यासाठी बांधण्यात आली आहे. परंतु भिंतीची उंची कमी असल्यामुळे पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी भिंतीवरून उडी मारून शॉर्टकटमार्ग अवलंबतात. पूर्वमुक्त द्रुतगती मार्गावर वाहनाची वेगमर्यादा ताशी ८० असल्यामुळे प्राणघातक अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, तसेच या ठिकाणी टॅक्सी चालक प्रवासी घेण्यासाठी उभे असतात परंतु या ठिकाणी टॅक्सी चालकाने या ठिकाणी थांबू नये असा फलक कुठेही लिहलेला नसल्याचे पथकाला आढळून आले, तसेच त्या ठिकाणी गतिरोधक देखील नव्हते असेही पथकाला आढळले. या निष्कर्षांच्या आधारे, वाहतूक पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सीमा भिंतीची उंची पाच फुटांपर्यंत वाढवण्याबाबत पत्र लिहून बृहन्मुंबई महानगरपालिकेला वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना फलक लावण्यास आणि रंबलर बसविण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा – महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे महत्वच कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न)

या पथकाने कांदिवली चारकोपमधील अपघातग्रस्त जागेलाही भेट दिली, परंतु त्यांनी अद्याप तेथील अहवाल तयार केलेला नाही नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईत होणाऱ्या प्राणघातक अपघातांना गांभीर्याने घेत, वाहतूक पोलिसांनी जूनमध्ये तीन अधिकार्‍यांचा समावेश असलेले एक पथक गठीत केले होते, हे पथक ज्या ठिकाणी प्राणघातक अपघात झाले अशा १२१ ठिकाणांना भेट देऊन अपघातांचे विश्लेषण करतील असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) एम. रामकुमार यांनी म्हटले आहे. अपघातग्रस्त वाहनांचे फिटनेस समजून घेण्यासाठी वाहनांचे फिटनेस अहवाल आणि आरटीओ तपासणी व्यतिरिक्त, आमची पथक घटनास्थळी भेट देईल आणि अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करेल, आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी पथक प्रादेशिक परिवहन विभाग आणि मुंबई महानगरपालिका किंवा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह प्रत्येक अपघात ठिकाणी जाऊन रस्त्याची स्थिती, पादचारी यांच्यासाठी पादचारी मार्गाची स्थिती जाणून त्यांच्या निष्कर्षांच्या आधारे हे पथक सविस्तर अहवाल तयार करेल अशी माहिती अधिकारी यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.