युपी ATS ने सीमा हैदर, सचिनसह मुलांना घेतले ताब्यात; अटक होण्याची शक्यता

158
युपी ATS ने सीमा हैदर, सचिनसह मुलांना घेतले ताब्यात; अटक होण्याची शक्यता
युपी ATS ने सीमा हैदर, सचिनसह मुलांना घेतले ताब्यात; अटक होण्याची शक्यता

उत्तर प्रदेश एटीएसच्या नोएडा युनिटने सीमा हैदरला राबुपुरा गावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिला अटक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सीमासोबत तिची चार मुले, सचिन आणि सचिनचे वडील यांनाही एटीएसने ताब्यात घेतले आहे. सीमाविरोधात आयबीने माहिती दिली होती. तिचे काका पाकिस्तानी सैन्यात सुभेदार आहेत आणि तिचा भाऊही पाकिस्तानी सैन्यात आहे. त्यामुळे तिचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे एटीएस, आयबी आणि नोएडा पोलिसांसह अनेक एजन्सी या संदर्भात तपास करत आहेत. सीमा हैदरच्या फोन कॉल डिटेल्सचीही चौकशी सुरू आहे.

सीमा हैदर यांच्या घराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. मात्र, ही नियमित तपासणी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीमा हैदरच्या हालचाली आणि संपर्कांवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. याप्रकरणी एटीएस पुन्हा अलर्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता सीमावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या रबुपुरा गावात सीमा हैदरच्या घरी एक इन्स्पेक्टर, २ महिला आणि एक पुरुष कॉन्स्टेबल तैनात आहेत. येथे पोलिस दोन शिफ्टमध्ये त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. बाहेरच्या व्यक्तीला त्यांना भेटू दिले जात नाही. सीमाचे कुटुंबीय कोणाला भेटत नसल्याचेही बोलले जात आहे. सीमाची तब्येत खराब असल्याचे सांगून ते लोकांना गेटमधून परत पाठवत आहेत.

दरम्यान, सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सीमा हैदर यांच्या नोएडा येथील घरावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच तिला भेटणाऱ्या लोकांवरही बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी सीमा यांच्या घराभोवती लोकांची गर्दी होऊ लागली. पोलिसांना माहिती मिळताच तेथे फौजफाटा तैनात करण्यात आला. या संघटनांनी सीमा हैदर सचिन तेंडुलकरसाठी भारतात येत असल्याच्या निषेधार्थ हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, मॉलसाठी, रस्ता तयार करण्यासाठी कराचीतील १५० वर्षे जुने मंदिर पाडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक आणि त्यांच्या धार्मिक प्रतीकांवर हल्ले होत आहेत, मात्र यावेळी सीमा हैदरच्या बहाण्याने हा हल्ला केला जात आहे.

यापूर्वी पाकिस्तानच्या एका स्थानिक संघटनेचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये एक व्यकती सीमाला मुलांसह पाकिस्तानला पाठवण्याची धमकी देताना दिसत होता. हातात बंदुका आणि बॉम्ब घेऊन ते रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. बंदुकीचा इशारा देत तो सांगत होता की, सीमाला परत पाठवले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील. दुसरीकडे सीमा हैदरने तिचा पहिला पती गुलाम हैदर याला सोमवारी थेट टीव्ही चॅनलवर घटस्फोट दिला आहे. गुलाम यांच्या आरोपांना उत्तर देताना सीमा म्हणाली की, “मी सचिनची पत्नी आहे”. सीमाचा पहिला पती गुलाम म्हणाला होता, “माझी मुलं अजूनही अल्पवयीन आहेत. त्यांना बळजबरीने हिंदू बनवलं जात आहे. सीमा ज्या प्रकारे भारतात गेली आहे, भारत सरकारने तिला तात्काळ अटक करावी, पण ते तसे करत नाहीत.

(हेही वाचा – Dhananjay Munde : बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार – धनंजय मुंडे)

३ वर्षांपूर्वी सीमा हैदर आणि सचिन PUBG (पबजी) गेमद्वारे एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांची मैत्री प्रेमापर्यंत पोहोचली. त्यानंतर सीमा आपल्या चार मुलांसह राबुपुरा येथील सचिनच्या घरी आली. पोलीस आणि तपास यंत्रणांना याची माहिती मिळाल्यानंतर सीमाला अटक करण्यात आली. तिला २ दिवसांनी जामीन मिळाला. तेव्हापासून ती बॉयफ्रेंड सचिनच्या घरी राहते. तिला पाहण्यासाठी लोक इथे जमू लागले. ४ मुलांसह पाकिस्तानातून पळून गेलेली सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडा येथील सचिन यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. पण सीमा हैदरचा नवरा गुलाम हैदर याचीही एक कथा आहे, ज्याने सीमाला मागे सोडले आहे. गुलामचा दावा आहे की सीमाने काही महिन्यांपूर्वी त्याच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते. सीमाने भारतात येण्यापूर्वी कर्ज घेऊन ७० हजारांचा फोन घेतला. त्याच्यावर पाकिस्तानी बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.