झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बँक दरोड्याची (Robbery) एक खळबळजनक घटना समोर आली. बरही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारीबाग रोडवर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दरोडेखोर शिरले आणि त्यांनी अवघ्या १० मिनिटांत तब्बल ७ कोटींचे सोने आणि ५ लाखांची रोकड घेऊन पसार झाले. पोलीस तपासात असे समोर आले की, हा संपूर्ण कट पूर्वनियोजित होता.
दोन जण सुरुवातीला ग्राहक बनून बँकेत आले आणि त्यांनी अकाऊंट सुरू करण्याचा बहाणा केला. काही वेळातच त्यांचे इतर दोन साथीदारही बँकेत दाखल झाले. त्यानंतर चौघांनी अचानक शस्त्र काढून बँक कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. बँकेत शिरताच त्यांनी कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांना एका ठिकाणी गोळा केले. शस्त्रांचा धाक दाखवून सर्वांना घाबरवण्यात आले आणि विरोध केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली गेली. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी बँक मॅनेजरला मारहाणही केली.
(हेही वाचा Iran Tensions : अमेरिका, इराण चर्चा होणार की नाही? आतापर्यंत पाकिस्तानमध्ये काय काय घडलंय?)
फिल्मी स्टाईल दरोडा
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण दरोडा (Robbery) फक्त १० मिनिटांत टाकला गेला. ते दुपारी ३:१९ वाजता बँकेत शिरले आणि ३:२९ वाजेपर्यंत लूट करून बाहेर पडले. कोणाला काही समजण्यापूर्वीच हे दरोडेखोर (Robbery) लॉकरमध्ये ठेवलेले सोने तसेच कॅश काउंटरमधील रोकड घेऊन पळाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. बँकेतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, खाते सुरू करण्याच्या बहाण्याने दोन दरोडेखोर आधी आले आणि त्यानंतर मागून इतर दोघे आले. त्यांच्याकडे छोटी शस्त्रे होती. शस्त्राच्या जोरावर त्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला होण्यास सांगितले आणि मॅनेजरला मारहाण केली. अजित कुमार विमल यांनी सांगितले की, चार दरोडेखोरांनी ही घटना घडवून आणली आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून ७ कोटींचे सोने आणि ५ लाखांची लूट झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community


