Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची धुडगूस; मध्यरात्री २० ते २५ वाहनांची तोडफोड

पुण्यातील येरवडा भागात मध्यरात्री २० ते २५ वाहनांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

175
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची धुडगूस; मध्यरात्री २० ते २५ वाहनांची तोडफोड
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची धुडगूस; मध्यरात्री २० ते २५ वाहनांची तोडफोड

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा  दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. खून, मारामाऱ्या, हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. शनिवारी (२३ डिसेंबर)  मध्यरात्री पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Pune Crime)
सोमवारी (२५ डिसेंबर) मध्यरात्री काही अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील येरवडा भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तोडफोडीत २० ते २५ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कार दुचाकी आणि रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. (Pune Crime)

(हेही वाचा : Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून मांजरी बुद्रुक येथील विविध विकासकामांची पाहणी)

दहशत माजविण्यासाठी धारधार शस्त्राने तरूणांकडून असा धुडगूस घातला जात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.