FDI : भारताच्या एफडीआयमध्ये २२ टक्के घट

देशात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत ४८.९८ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली. गेल्या वर्षी हे प्रमाण ६२.६६ अब्ज डॉलर्स होती.

155
FDI : भारताच्या एफडीआयमध्ये २२ टक्के घट
FDI : भारताच्या एफडीआयमध्ये २२ टक्के घट

भारतात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) २२ टक्क्यांची घट झालीय. देशात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत ४८.९८ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली. गेल्या वर्षी हे प्रमाण ६२.६६ अब्ज डॉलर्स होती. यंदा एफडीआयमध्ये (FDI) २२ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. (FDI)

यंदा एफडीआयमध्ये (FDI) घसरण असली तरी पुढील वर्षी देशात एफडीआय (FDI) वाढण्याची शक्यता आहे. उत्तम आर्थिक डेटा आणि औद्योगिक उत्पादनातील वाढ आणि आकर्षक पीएलआय (PLI) योजनेमुळे अधिक विदेशी कंपन्या भारतात आकर्षित होतील, असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (DPIIT) म्हणणे आहे. भू-राजकीय अडथळे आणि जागतिक स्तरावर व्याजदरबाबत कठोर भूमिका असताना भारत हे गुंतवणुकीचे पसंतीचे ठिकाण राहिले आहे.देशात २०२३ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत देशातील एफडीआय (FDI) ४८.९८ अब्ज पर्यंत कमी झाली आहे. मात्र, २०१४ ते २०२३ या काळात देशात ५९६ अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक आली. (FDI)

(हेही वाचा – Siyaram Gupta Rammandir : असे आहेत राममंदिराचे प्रथम अर्पणदाते; दान करण्यासाठी घेतले ‘इतके’ कष्ट)

२००५ ते २०१४ दरम्यान भारताला मिळालेल्या एफडीआयपेक्षा (FDI) हा आकडा जवळपास दुप्पट आहे. आगामी २०२४ मध्ये एफडीआयला (FDI) गती मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे, औद्योगिक उत्पादनात वाढ आणि पीएलआय (PLI) योजनेमुळे अधिक संख्येने परदेशी कंपन्या भारताकडे आकर्षित होतील. जगातील अनेक देशांमध्ये सध्या सुरू असलेली आर्थिक मंदी आणि कठोर व्याजदरांमुळे भारत हे एफडीआयसाठी (FDI) गुंतवणुकीचे आवडते ठिकाण राहिले आहे. (FDI)

एफडीआयबाबत (FDI) काळजी करण्यासारखे काही नाही. उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना (PLI) औषध, अन्न प्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात सकारात्मक परिणाम देत आहेत. यापैकी अनेक क्षेत्रांमध्ये एफडीआय (FDI) वाढला आहे. सिंगापूर, अमेरिका आणि ब्रिटनच्या जीडीपीत (GDP) झालेली वाढ हे या वर्षी एफडीआयमध्ये (FDI) घट होण्याचे एक कारण असू शकते. (FDI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.