Nanded: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर गाडीला भीषण आग

अग्निशमन दलासह आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.

140
Nanded: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर गाडीला भीषण आग
Nanded: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर गाडीला भीषण आग

नांदेडजवळ (Nanded) पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला मंगळवारी भीषण आग लागली. ही आग कशी लागली याबाबत चौकशी सुरू आहे. नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये ही गाडी उभी होती. त्यावेळी रिकाम्या लगेजच्या व्हॅन कोचला आग लागली. या घटनेनंतर ३० मिनिटांत आग आटोक्यात आली. यावेळी इतर कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंना अयोध्यामध्ये निमंत्रण न देण्यामागील कारण गिरीश महाजनांनी सांगितले; म्हणाले…  )

आगीची घटना घडल्यानंतर तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला कळवण्यात आली. अग्निशमन दलासह आजूबाजूच्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.