कोविड बॉडी बॅग, रेमडेसिव्हीर खरेदी आणि ऑक्सिजन प्लांट संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू

96
कोविड बॉडी बॅग, रेमडेसिव्हीर खरेदी आणि ऑक्सिजन प्लांट संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू
कोविड बॉडी बॅग, रेमडेसिव्हीर खरेदी आणि ऑक्सिजन प्लांट संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू

कोविड टेंडर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बॉडी बॅग खरेदी, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लांटची स्थापना आणि महानगरपालिकेने दिलेल्या विविध कंत्राटांशी संबंधित कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात शुक्रवारी चार स्वतंत्र प्राथमिक चौकशी सुरू केली. कोविड-१९ कालावधीत विविध कंत्राटदार आणि पुरवठादारांना महानगरपालिका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशीची पुष्टी केली आणि सांगितले की, कोविड दरम्यान मनपामधील विविध कथित घोटाळा प्रकरणात प्राथमिक चौकशीसाठी विशेष पथके गठीत करण्यात आली आहे. या चौकशीत दखलपात्र गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी प्राथमिक चौकशी करण्यात येत असून यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती या संबंधी काही कागदपत्रे लागली असून त्या आधारे ही चौकशी करण्यात येत आहे.

प्राथमिक चौकशीत दखलपात्र गुन्हा घडला हे उघडकीस आल्यानंतर प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवून तपास सुरू केला जात असल्याची माहिती एका अधिकारी यांनी दिली. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच मनपा अधिकारी आणि कंत्राटदारांना लवकर या प्राथमिक चौकशीला सामोरे जावे लागेल. या प्राथमिक चौकशीत बॉडी बॅग खरेदी, रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन प्लांटशी संबंधित करार आणि कोविड जंबो केंद्रांवर केलेल्या इतर विविध विस्तारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून यासंबंधी अधिकाऱ्यांकडे चौकशी करून या संबंधीची कागदपत्रे तपासली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – ‘सुनील आणि तुम्ही बसून मिटवा’; अमित साटम यांना निरोप देणारा ‘तो’ नेता कोण?)

प्राथमिक चौकशीच्या रडारवर असलेल्या एका खाजगी कंपनीने मनपाला मृत कोविड-१९ रुग्णांसाठी बॉडी बॅग ६ हजार ८०० रुपये प्रति नग पुरवल्या होत्या, जे त्याच कालावधीत इतर खाजगी रुग्णालये किंवा सरकारी प्राधिकरणांमध्ये आकारल्या गेलेल्या किमतींपेक्षा तिप्पटीने होत्या. हे यापूर्वी ईडीच्या चौकशीत उघड झाले होते. कोविड-१९ उपचारांची औषधे, प्रामुख्याने मनपा संचालित रुग्णालयांद्वारे वापरलेली रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स, त्या काळात बाजारात उपलब्ध असलेल्या २५ ते २३० टक्के जास्त किमतीत खरेदी केली गेली असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.

याशिवाय, ऑक्सिजन प्लांट्स आणि विविध कोविड फील्ड हॉस्पिटल्स उभारणाऱ्या कंत्राटदारांना जास्त आणि अवाजवी देयके देण्यात आली. ईडीकडून सुरू असलेल्या तपासात कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणातील हा सर्व घोटाळा समोर आला आहे. ईडीकडे मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणात सुजित पाटकर आणि डॉ. बिसुरे यांना अटक करण्यात आली आहे. बॉडी बॅग खरेदी, रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजन प्लांटमध्ये झालेल्या घोटाळा संबंधी ईडीने कागदपत्रे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवली असून या कागदपत्राच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.