मनाचे सामर्थ्य वैज्ञानिक प्रगतीपेक्षा मोठे – वर्षा गजेंद्रगडकर

76
मनाचे सामर्थ्य वैज्ञानिक प्रगतीपेक्षा मोठे - वर्षा गजेंद्रगडकर

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे भान जरूर आत्मसात करा, पण मनाचे सामर्थ्य या सर्वांपेक्षा मोठे आहे, हे विसरू नका, असा सल्ला प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी शुक्रवारी येथे विद्यार्थिनींना दिला. ‘मनाचे सामर्थ्य हे शस्त्र आहे. ते सतत धारदार ठेवा. आपल्या ध्येयाचे शिखर त्यातूनच आपण गाठू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

सावित्री फोरम आयोजित ‘विद्यानिधी’ उपक्रम आणि ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना पहिला ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘विद्यानिधी’ उपक्रमांतर्गत पुण्यातील व आसपासच्या ग्रामीण भागांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या हुशार पण गरजू अशा ७५ विद्यार्थिनींना शैक्षणिक १ लाख रुपये मदतनिधीचे वाटप करण्यात आले.

(हेही वाचा – Heavy Rain : राज्यात ‘या’ भागात अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट)

गजेंद्रगडकर म्हणाल्या,‘ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी योगदान दिले. आता काळ बदलला असला तरी विद्येचे महत्त्व अबाधित आहे, हे जाणून खूप शिका. विद्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करतेच, पण ती माणूस घडवते. खंबीर बनवते. विचारांच्या कक्षा रुंदावते’.

डॉ. जाधव म्हणाल्या,”ज्यांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले त्या सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार आनंददायी आहे, पण जबाबदारी वाढवणारा आहे, याची जाणीव आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत असताना, मला मोठा संघर्ष करावा लागला आहे. पण या पुरस्काराने पाठबळ दिले आहे. आत्मविश्वास दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा काही वेळा गैरवापर होत असल्याचे गर्भलिंगनिदान तंत्रज्ञानाने समोर आणले. लिंगनिदान चाचणी स्त्री गर्भाच्या जिवावर उठल्याचे दिसून आले. तेव्हा त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा लागू झाला. मात्र, समाजाचा समतोल राखण्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.