Lawrence Bishnoi ला घेण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटवर पाठवली ‘ओला कॅब’

मागील काही दिवसांपासून सलमान खान संदर्भात प्रसारमाध्यमांवर सलमान खानच्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराचे वृत्त दाखविण्यात येत आहे. सलमान खानच्या सुरक्षेला घेऊन सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

1826
Lawrence Bishnoi ला घेण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटवर पाठवली 'ओला कॅब'

‘गॅलेक्सी अपार्टमेंटवर’ आलेल्या एका ओला कॅब चालकाने गुरुवारी सकाळी एकच खळबळ उडवून दिली होती. गॅलेक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिष्णोईला (Lawrence Bishnoi) घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात सोडण्यासाठी ओला बुक करण्यात आली असल्याचे ओला चालकाने सांगताच गॅलेक्सी अपार्टमेंटवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये गोंधळ उडाला होता. पोलिसांनी ओला बुक करणाऱ्याची माहिती काढून २४ तासांत एकाला उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सलमान खानला घेऊन चिंतेत होतो, व लॉरेन्स बिस्नोई अद्दल घडविण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या तरुणाने पोलिसांना दिली आहे. (Lawrence Bishnoi)

रोहित त्यागी (२१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे राहणारा आहे. ‘बीबीए’च्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणारा रोहित त्यागी हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. मागील काही दिवसांपासून सलमान खान संदर्भात प्रसारमाध्यमांवर सलमान खानच्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबाराचे वृत्त दाखविण्यात येत आहे. सलमान खानच्या सुरक्षेला घेऊन सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच गाजीयाबाद येथे राहणाऱ्या रोहित त्यागी या चाहत्याने सलमान खानला धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई या गुंडाला अद्दल घडविण्यासाठी धक्कादायक असा प्रकार केला. (Lawrence Bishnoi)

(हेही वाचा – PM Narendra Modi : कॉंग्रेसची नेहमी विकासविरोधी भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र)

लॉरेन्सला अद्दल घडविण्यासाठी केले कृत्य 

रोहित त्यागी याने स्वतःच्या मोबाईल फोन मधील ओला कॅबच्या अप्लिकेशनमध्ये जाऊन मुंबईच्या लोकेशन देऊन एक ओला बुक केली, त्यानंतर त्याने ओला बुक करतांना वांद्रे गॅलक्सी आपर्टमेंट असा पत्ता दिला आणि तेथून लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याला घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात आणायचे असल्याचे चालकाला सांगितले. ओला चालकाने जास्त चौकशी न करता गुरुवारी सकाळी थेट कॅब घेऊन गॅलेक्सी आपर्टमेंट गाठले, गॅलक्सि आपर्टमेंटच्या बाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ओला चालकाला थांबवले व त्याच्याकडे चौकशी केली असता लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) येथेच राहतात ना, त्यांना घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात जाण्यासाठी ओला कॅब बुक करण्यात आली असल्याचे पोलिसांना सांगितले. (Lawrence Bishnoi)

ओला चालकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ओला कॅब चालकाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी करून ओला बुक करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली असता रोहित त्यागी नावाच्या व्यक्तीने उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून ओला कॅब बुक केल्याची माहिती समोर आली. वांद्रे पोलिसांनी प्रथम गुन्हा दाखल करून पोलिसांचे एक पथक यूपीला रवाना करण्यात आले. या पथकाने गाजियाबाद येथून रोहित त्यागी या तरुणाला ताब्यात घेऊन शुक्रवारी मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली. रोहितला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहित त्यागी हा विद्यार्थी असून बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो सलमान खान चाहता असून सलमान खानच्या जीवाला लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) पासून धोका असल्यामुळे लॉरेन्सला अद्दल घडविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. (Lawrence Bishnoi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.