kidnapping News : साडेपाच वर्षाच्या मुलीच्या अपहरणा प्रकरणी एकाला अटक, मुलीची सुखरूप सुटका

रोतीन घोष (३५) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

21
kidnapping News : साडेपाच वर्षाच्या मुलीच्या अपहरणा प्रकरणी एकाला अटक, मुलीची सुखरूप सुटका
kidnapping News : साडेपाच वर्षाच्या मुलीच्या अपहरणा प्रकरणी एकाला अटक, मुलीची सुखरूप सुटका

प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या साडे पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ३५ वर्षीय प्रियकराला रेल्वे पोलिसांच्या मदतीने इगतपुरी येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले असून अपहरणकर्त्याच्या ताब्यातून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

रोतीन घोष (३५) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. मुंबईतील कामाठीपुरा गल्ली नंबर १२ येथे पती आणि दोन लहान मुलांसह राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहिते सोबत रोतीन घोष याचे प्रेमप्रकरण सुरू होते. ५ सप्टेंबर रोजी मुलीला खाऊ घेऊन देण्याच्या निमित्ताने रोतीन याने प्रेयसीच्या साडे पाच वर्षांच्या मुलीला घेऊन गेला. बराच वेळ तो मुलीला घेऊन न आल्यामुळे तीने त्याच्या मोबाईल फोनवर कॉल करून विचारले असता थोड्या वेळात येतो असे सांगून त्याने मुलीला घेत सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले.

(हेही वाचा – Fraud Businessman : लुटीची खोटी तक्रार देणाऱ्या व्यापाऱ्याचा बनाव उघडकीस)

काही वेळाने मुलीच्या आईने रोतीनला पुन्हा फोन करून विचारले असता त्याने तू तुझ्या पतीला घटस्फोट दे त्यानंतर मी मुलीला परत करेल अशी धमकी दिली. मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे कळताच विवाहितेने नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. रोतीन हा पश्चिम बंगाल येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचे टॉवर लोकेशन तपासले असता तो शालिमार एक्स्प्रेस मधून इगतपुरी येथे पोहचला असल्याची माहिती मिळाली. नागपाडा पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रोतीन घोष याला इगतपुरी रेल्वे स्थानकातून मुलीसह ताब्यात घेऊन मुंबईत आणले. पोलिसांनी रोतीन घोष याला अटक करून त्याच्या ताब्यात असलेल्या साडे पाच वर्षांच्या मुलीची सुटका केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.