Mumbai Police : मुंबईत राबविण्यात आले ‘ऑल आऊट ऑपरेशन’

शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू करण्यात आलेले 'ऑल आऊट ऑपरेशन' हे शनिवारी पहाटे ३ वाजेपर्यत सुरू होते. या दरम्यान पोलिसांकडून ८८७ वॉन्टेड आणि फरार गुन्हेगार तपासण्यात आले त्यापैकी २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

178
Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या २८ जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द
Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या २८ जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झालेली असताना या सेलिब्रेशनवर कुठलेही विघ्न नको यासाठी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) संपूर्ण मुंबईत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ (All Out Operation) राबविण्यात आले. शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू करण्यात आलेले ‘ऑल आऊट ऑपरेशन’ (All Out Operation) हे शनिवारी पहाटे ३ वाजेपर्यत सुरू होते. या दरम्यान पोलिसांकडून ८८७ वॉन्टेड आणि फरार गुन्हेगार तपासण्यात आले त्यापैकी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान ७९६४ वाहने तपासण्यात आली असून ६३ जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची (Drunk and Drive) कारवाई करण्यात आली आहे. ५ अतिरिक्त पोलिस आयुक्त, १३ पोलिस उपायुक्त, ४१ सहायक पोलिस आयुक्त आणि ९३ पोलिस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून ही विशेष मोहीम राबविण्यात आली. (Mumbai Police)

स्वीपिंग कोम्बिंग ऑपरेशनमध्ये इतक्या ठिकाणांचा समावेश

पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन पोलिसांना नाकाबंदी (चेकपॉईंट) आणि गुन्हेगारांच्या शोध मोहिमे दरम्यान मार्गदर्शन केले. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली, परिणामी २३ फरार आणि वाँटेड व्यक्तींना अटक करण्यात आली. स्वीपिंग कोम्बिंग ऑपरेशनमध्ये (Sweeping combing operation) २१७ ठिकाणांचा समावेश होता. रस्त्यावर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान ७९६४ वाहनांची तपासणी करण्यात आली, विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १८०७ जणांवर दंडात्मक कारवाई तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत १,३५५ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ६३ मद्यधुंद चालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. ऑल आऊट ऑपरेशन (All Out Operation) दरम्यान पोलिसांकडून ८८७ पाहिजे आरोपी आणि फरार गुन्हेगार तपासण्यात आले असून त्यापैकी विविध गुन्ह्याततील २३ जणांना अटक करण्यात आली. (Mumbai Police)

(हेही वाचा – PM Narendra Modi अचानक एका गरीब कुटुंबाच्या घरात गेले, चहा प्यायले आणि गप्पा मारत बसले)

२१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन

महिलांविरुद्धचे गुन्हे आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ३१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) राबविण्यात आले. अवैध दारू विक्री आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या ९५ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून ६३ जणांना अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अजामीनपात्र वॉरंटच्या आधारे ७७ लोकांना अटक करण्यात आली आणि एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ) कलमांतर्गत १०४ जणांना अटक करण्यात आली. आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ५० जणांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या २६४ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.