Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताच्या ‘या’ प्रमुख खेळाडूला दुखापत

पहिल्या कसोटीतील पराभव झटकून टाकून भारतीय संघाने केपटाऊनच्या दुसऱ्या कसोटीची तयारी सुरू केली आहे.

158
Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताच्या ‘या’ प्रमुख खेळाडूला दुखापत
Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताच्या ‘या’ प्रमुख खेळाडूला दुखापत
  • ऋजुता लुकतुके

पहिल्या कसोटीतील पराभव झटकून टाकून भारतीय संघाने (Indian team) केपटाऊनच्या दुसऱ्या कसोटीची तयारी सुरू केली आहे. (Ind vs SA 2nd Test)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला (Indian team) शनिवारी दुखापतीचा एक जोरदार धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) नेट्समध्ये फलंदाजी करताना खांद्यावर चेंडू लागून दुखापत झाली आहे. चेंडूचा आघात इतका मोठा होता की, कदाचित शार्दूल (Shardul Thakur) दुसऱ्या कसोटीलाही मुकू शकतो. अर्थात, अजून स्कॅनचे अहवाल येणं बाकी आहे. (Ind vs SA 2nd Test)

केपटाऊनची दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. चेंडू खांद्याला बसल्यानंतर शार्दूल (Shardul Thakur) कळवळला. आणि त्यानंतर नेट्समध्ये तो गोलंदाजीसाठीही येऊ शकला नाही. भारतीय संघाच्या (Indian team) फलंदाजी नेट्समध्ये तेव्हा थ्रो-डाऊन सत्र सुरू होतं. आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड फलंदाजांना सराव देत होते. शार्दूल (Shardul Thakur) या सत्रातील पहिला सराव करणारा खेळाडू होता. (Ind vs SA 2nd Test)

(हेही वाचा – Ramdas Athawale निवडणूक रिंगणात)

पहिल्या सेंच्युरियन कसोटीतही शार्दूलच्या (Shardul Thakur) याच खांद्यावर कासिगो रबाडाचा चेंडू बसला होता. तेव्हाही तो आघात मोठाच होता. आणि शार्दूलने (Shardul Thakur) मैदानावर फीजिओची मदतही घेतली होती. पण, त्यानंतर त्याने फलंदाजी सुरूच ठेवली. सरावादरम्यान मात्र शार्दूलने (Shardul Thakur) मैदान सोडलं. आणि नंतरच्या नेट्समध्ये तो सहभागी झाला नाही. (Ind vs SA 2nd Test)

पहिल्या कसोटी सामन्यात शार्दूलची (Shardul Thakur) कामगिरी यथातथाच होती. आणि दोन्ही डावात मिळून त्याने २६ धावा केल्या. आणि त्याच्या १९ षटकांत शंभरच्या वर धावा लुटल्या गेल्या. (Ind vs SA 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.