PM Narendra Modi अचानक एका गरीब कुटुंबाच्या घरात गेले, चहा प्यायले आणि गप्पा मारत बसले

236

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे कायम त्यांच्या कृतीतून सामान्यांचे मन जिंकून घेत असतात. अशीच एक कृती पंतप्रधान मोदी यांची शनिवारी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अयोध्येच्या दौऱ्यावर दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी प्रॉटोकॉल तोडून स्वसामन्यांसारखी कृती केली.

(हेही वाचा Mumbai Riots : जरांगे-पाटलांचा मुंबईत ३ कोटी जमाव जमवण्याचा इशारा; यापूर्वी कोणकोणत्या आंदोलनांमुळे हादरलेली मुंबई?)

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात कोणत्याही पूर्वनिर्धारित कार्यक्रमाशिवाय अयोध्येतील एका वसाहतीला देखील भेट दिली. नरेंद्र मोदी अचानक पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी चहापानही केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांचा नरेंद्र मोदींचा  (PM Narendra Modi) हा कार्यक्रम अगोदर ठरलेला नव्हता. अशा परिस्थितीत प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक मीराच्या घरी आल्याने संपूर्ण कॉलनीतील लोक आश्चर्यचकित झाले. पंतप्रधान मोदी येताच त्या परिसरात ‘मोदी-मोदी अन् जय श्री रामच्या’ घोषणांनी दुमदुमून गेला. या प्रसंगी मोदींनी मीराने बनवलेला चहा प्यायला आणि चहा चांगला आहे, पण थोडा गोड झाला आहे असे सांगितले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी घरातील सर्वांची विचारपूस केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.