Eknath Shinde: मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा

178
Eknath Shinde: मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा
Eknath Shinde: मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू करावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. शनिवारपासून सुरू झालेली जालना- मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळेदेखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते अयोध्या रेल्वे  सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला केली. मुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. राज्यात रेल्वेने १ लाख ७ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत. वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी एकदा ठरवलं की, तो प्रकल्प किंवा कार्यक्रम टाईम बाउंड पद्धतीनं पूर्ण होतोच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा – Ram Mandir: ‘पुष्पक विमानातील तीर्थयात्रा’, अयोध्येतील पहिल्या विमान उड्डाणाबाबत प्रवाशांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया; वाचा सविस्तर… )

प्रारंभी मध्य रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक चित्तरंजन स्वैन यांनी प्रारंभी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनचे स्थानकावर आगमन झाले तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनी सुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली.

प्रवाशांकडून समाधान व्यक्त…
त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले. प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वे कोचमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनीदेखील यावेळी समाधान व्यक्त केले. या रेल्वेमुळे आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदौर, नागपूर ते बिलासपूर अशा ७ ट्रेन्स धावतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.