Ram Mandir: ‘पुष्पक विमानातील तीर्थयात्रा’, अयोध्येतील पहिल्या विमान उड्डाणाबाबत प्रवाशांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया; वाचा सविस्तर…

विमानाचे हे पहिले उड्डाण त्यांच्यासाठी दैवी आशीर्वाद देणारे ठरले.

263
Ram Mandir: 'पुष्पक विमानातील तीर्थयात्रा', अयोध्येतील पहिल्या विमान उड्डाणाबाबत प्रवाशांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया; वाचा सविस्तर...
Ram Mandir: 'पुष्पक विमानातील तीर्थयात्रा', अयोध्येतील पहिल्या विमान उड्डाणाबाबत प्रवाशांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया; वाचा सविस्तर...

अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन शनिवारी (३० डिसेंबर) पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधान मोदींचे उद्घटानाकरिता विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विमानतळावर प्रवाशांची गर्दीही झाली होती. त्यांनाही राम लल्लाचे (Ram Mandir) दर्शन घ्यायचे होते. इंडिगो कंपनीच्या पहिल्या कमर्शियल विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विमान प्रवासाला अनोखे आणि वैशिष्ट्यपूर्ण नाव दिले आहे. 

अयोध्या धाम येथील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमानातून त्यांनी केलेल्या या प्रवासाचे वर्णन ‘पुष्पक विमानातील तीर्थयात्रा’ असे असे म्हटले आहे. काही प्रवाशांनी हनुमानाच्या किष्किंधा पर्वतावरील जन्मस्थळी असलेली पवित्र माती आणि जल घेतले. विमानाचे हे पहिले उड्डाण त्यांच्यासाठी दैवी आशीर्वाद देणारे ठरले. विमानतळावरील वातावरण चैतन्यदायी होते. अशा दैवी वातावरणात श्रीरामाचे नामस्मरण आणि हनुमान चालिसा म्हणत प्रवास केला, अशा शब्दांत विमाना प्रवासाचे वर्णन प्रवाशांनी केले आहे.

(हेही वाचा –Ram Mandir: प्रवाशांचे स्वागत करून दिल्या ‘जय श्री राम’ घोषणा, पायलटने व्यक्त केले पहिल्या उड्डाणाविषयीचे मनोगत…वाचा सविस्तर )

शनिवारी दुपारी इंडिगो कंपनीच्या एअरबस (IndiGo Airbus A320 VT-IQA) या अयोध्येला येणाऱ्या पहिल्या कमर्शियल विमानातून प्रवाशांनी प्रवास केला. या विमानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे नामकरण करून उद्घाटन केले. या उद्घाटन समारंभाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचे अंत:करण प्रभु श्रीरामाच्या नामस्मरणाने भरून गेले होते. ‘रामायण’ या महाकाव्याची महती प्रत्येकाच्या ह्रदयात ठसत होती.

‘आम्हाला फक्त अयोध्येला पहिल्यांदाच उड्डाण करणाऱ्या विमानाने जायचे होते आणि रामलल्लांचं दर्शन घ्यायचं होतं. इथे यायला मिळणं हा आमच्यासाठी दैवी आशीर्वाद आहे. ‘, अशी प्रतिक्रिया पहिल्या उड्डाणाच्या वेळी विमानाने अयोध्येला येणारे राजस्थान येथील रेडिमेड गारमेंटचे व्यापारी कमल कुमार यांनी व्यक्त केली. बेंगळुरू येथून आलेले शशिकांत शर्मा यांनी येथील हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या किष्किंधा पर्वतावरील पवित्र माती आणि जल सोबत घेतले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.