North Mumbai LS Constituency : अस्लम शेख यांचा उत्तर मुंबई ऐवजी उत्तर मध्य मुंबईतच प्रचार

उत्तर मुंबईत भाजपाचे पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना शेवटच्या क्षणाला उमेदवारी दिली आहे. मात्र, भूषण पाटील यांच्या उमेदवारीला एक प्रकारचा विरोध दिसून येत आहे.

132
North Mumbai LS Constituency : अस्लम शेख यांचा उत्तर मुंबई ऐवजी उत्तर मध्य मुंबईतच प्रचार

मालाड मतदार संघाचे आमदार अस्लम शेख हे स्वत:च्या उत्तर मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्याऐवजी चक्क उत्तर मध्य मुंबईतच प्रचारात अधिक दिसायला लागले आहेत. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारातच अस्लम शेख हे हजेरी लावत असल्याने त्यांना उत्तर मुंबईतील उमेदवार मान्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही नाराजी आता उघड होत आहे. (North Mumbai LS Constituency)

उत्तर मुंबईत भाजपाचे पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना शेवटच्या क्षणाला उमेदवारी दिली आहे. मात्र, भूषण पाटील यांच्या उमेदवारीला एक प्रकारचा विरोध दिसून येत आहे. रविवारी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी शशी थरुर हे मुंबईत आले होते. शशी थरुर यांनी उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील आणि उत्तर मुंबईचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. (North Mumbai LS Constituency)

(हेही वाचा – Water Tankers : पश्चिम विदर्भात टँकर फेऱ्यांमध्ये वाढ; कोट्यवधींचा खर्च)

या विधानसभा क्षेत्रातून मातोंडकर यांना जास्त मतदान

परंतु उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या वांद्रे पश्चिम येथील प्रचार रॅलीत शरीर थरुर हे सहभागी झाले. या रॅलीत आदित्य ठाकरे, काँग्रेस आमदार अस्लम शेख, सपाचे आमदार रईस शेख आदी उपस्थित होते. तर उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार रॅलीतही शशी थरुर यांनी भाग घेतला होता. शशी थरुर यांच्यासमवेत झालेल्या या रॅलीत अस्लम खान दिसले नाही की अन्य कोणता नेता दिसला नाही. त्यामुळे अस्लम शेख यांना पाटील यांची उमेदवारी मान्य नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (North Mumbai LS Constituency)

उत्तर मुंबई लोकसभा २०१९मध्ये काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती, परंतु निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मातोंडकर यांनी भूषण पाटील, संदेश कोंडविलकर यांच्या कारभारावर शंका उपस्थित करत आपल्याला सहकार्य केले नसल्याचा आरोप केला होता. मात्र, एकमेव मालाड विधानसभा क्षेत्रातून मातोंडकर यांना जास्त मतदान झाले होते. परंतु यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अस्लम शेख यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली नाही. त्यामुळे उत्तर मध्य मुंबइच्या उमेदवार वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा असल्याने त्यांना मदत करण्यासाठी अस्लम शेख झटत असल्याचे दिसून येत आहे. (North Mumbai LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.