Mumbai Crime : उपनगरात ‘एमटीएनएल’ केबल चोरांची दहशत; आंबोली पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त

357
Mumbai Crime : उपनगरात 'एमटीएनएल' केबल चोरांची दहशत; आंबोली पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त
  • प्रतिनिधी 

‘एमटीएनएल’ केबल चोरीचे सर्वात मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आंबोली पोलिसांना यश आले आहे. आंबोली पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांना अटक केली असून एक जेसीबी, दोन टेम्पो, एक इनोव्हा कार आणि कटिंग केलेली केबल असा जवळपास पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या केबल चोरीच्या रॅकेटमध्ये एक स्थानिक राजकीय नेत्याचा समावेश असल्याची चर्चा आहे. आंबोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटेंनी दिली. (Mumbai Crime)

New Project 2025 09 10T191501.511

(हेही वाचा – Nepal मधील उद्रेकाची धग भारताच्या सीमेपर्यंत; ५ कैद्यांना सीमा सुरक्षा बलाने पाठवले माघारी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी पश्चिम एस. व्ही. रोड वर असलेल्या फारुख हायस्कुल या ठिकाणी मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री काही इसम जेसीबीच्या साहाय्याने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची केबल चोरी करीत असल्याची माहिती आंबोली पोलिसांना मिळाली. आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटेंनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी काही इसम रस्त्यावर असलेल्या चेंबर्स मधून टेलफोन केबल कटिंग करीत असल्याचे समोर आले. या महानगर टेलिफोन निगमच्या केबल चोरीमुळे जोगेश्वरी पश्चिम विभागातील टेलफोन इंटरनेट सेवा, तसेच टेलिफोन सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली आहे. (Mumbai Crime)

New Project 2025 09 10T191602.927

(हेही वाचा – PUC नाही तर टाकी रिकामीच; सरकारचा मोठा निर्णय)

पोलिसांनी घटनास्थळावरून ८ जणांना ताब्यात घेऊन एक जेसीबी, दोन आयशर टेम्पो, इनोव्हा मोटारकार, आणि कटिंग केलेली ५८ लाख किमतीची केबल असा एकूण जवळपास पावणे दोन कोटींचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान आंबोली पोलिसांनी महानगर टेलिफोन निगमच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन त्यांना घटनास्थळी बोलावून घेत त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून बुधवारी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटेंनी दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या केबल चोरी रॅकेटमध्ये एका स्थानिक राजकीय नेत्याचा सहभाग असल्याची शक्यता आहे, त्याच बरोबर महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कुठला अधिकारी यामध्ये सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.